Mayank Agarwal Dainik Gomantak
क्रीडा

Love Story: बायको वकील, सासरे डीजीपी, या क्रिकेटपटूची प्रेमकहाणी आहे खूप खास

Cricketer's Love Story: टीम इंडियातून सध्या बाहेर असणारा मयंक अग्रवाल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

दैनिक गोमन्तक

Cricketer's Love Story: टीम इंडियातून सध्या बाहेर असणारा मयंक अग्रवाल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मयंक अलीकडच्या काळात अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे, मयंकचे पर्सनल लाइफ त्याच्या फलंदाजीइतकेच धमाकेदार आहे. चला तर मग त्याच्याविषयी जाणून घेऊया...

दरम्यान, 16 फेब्रुवारी 1991 रोजी बंगळूरु, कर्नाटक येथे जन्मलेल्या मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2018 मध्ये कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांची मुलगी आशिता सूदशी लग्न केले. मयंकने आशिता सूदला अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये लग्नासाठी प्रपोज केले होते. जानेवारी 2018 मध्ये त्याने थेम्स नदीच्या काठावर बांधलेल्या 'लंडन आय' स्विंगवर प्रपोज केले होते.

दुसरीकडे, मयंक अग्रवाल हे एक प्रसिद्ध नाव बनले आहे. एका अहवालानुसार, मयंक अग्रवालची एकूण संपत्ती सुमारे 3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात सुमारे 26 कोटी आहे. त्याच वेळी, आशिता सूद मूळची कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरुची आहे. आशिताने 'क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन'मधून 'मास्टर ऑफ लॉ'चे शिक्षण घेतले आहे. मयंकची पत्नी आशिता सूद पेशाने वकील आहे.

तथापि, मयंक अग्रवालने 2017 च्या शेवटी ऑस्ट्रेलियात (Australia) पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी आतापर्यंत 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 1488 धावा आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने 86 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT