Dwaine Pretorius announced retirement  Dainik Gomantak
क्रीडा

South Africa Cricket: वयाच्या 33 व्या वर्षीच द. आफ्रिकन ऑलराऊंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.

Pranali Kodre

Dwaine Pretorius: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन प्रिटोरियसमे सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. 33 वर्षीय प्रिटोरियसने टी20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

साल 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 3 कसोटी, 27 वनडे आणि 30 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत. तो दोन वर्ल्डकपमध्येही दक्षिण आफ्रिकेकडून खेळला आहे.

तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाराही क्रिकेटपटू आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 17 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

निवृत्ती घेताना प्रिटोरियसने सांगितले की 'काही दिवसांपूर्वी मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय घेतला. मी सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.'

'मोठा होत असताना माझे एकच लक्ष्य होते की मला दक्षिण आफ्रिकेकडून खेळायचे आहे. मला माहित नाही की हे सर्व कसे होणार होते, पण ईश्वराने माझ्यात प्रतिभाआणि यशस्वी होण्यासाठी इच्छा निर्माण केली. बाकी सर्व त्याच्या हातात होते.'

त्याने पुढे म्हटले आहे की 'मी माझे लक्ष टी20 क्रिकेटवर आणि इतर क्रिकेटच्या छोट्या प्रकारांवर केंद्रीत करत आहे. फ्री एजंट म्हणून मला क्रिकेटच्या लहान प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी मदत होईल. यामुळे मी माझी कारकिर्द आणि कुटुंब यांच्यात समतोल साधू शकेल. मी माझ्या कारकिर्दीत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या सर्वांना धन्यवाद.'

याशिवाय प्रिटोरियसने माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचेही त्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.

प्रिटोरियस जगभरातील अनेक क्रिकेट लीगचा भाग आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. तसेच तो द हंड्रेड, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा लीग स्पर्धांमध्येही खेळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT