During Olympics there is emergency in Japan  Dainik Gomantak
क्रीडा

Japan: ऑलिंपिकच्या तोंडावरच टोकियोत आणिबाणी

जपानमध्ये(Japan) सध्या कोविडची जवळपास चौथी लाट आली असून आतापर्यंत 14 हजार 800 जणांचा मृत्यु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

जपानमध्ये(Japan) कोरोनाचा धोका आणखीनही टळलेला नाही. जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकला(Olympics) आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र कोरोनाचा(Covid19) धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने देशात होणाऱ्या ऑलिंपिकपासून प्रेक्षकांना रोखण्यासाठी जपान सरकारने या कालावधीत टोकियोत(Tokyo) पुन्हा एकदा आणिबाणी जाहिर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे आता ऑलिंपिक स्पर्धा विना प्रेक्षक होणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी लादलेली आणिबाणी उठवताना जपान सरकारने ऑलिंपिकसाठी प्रत्येक स्पर्धा केंद्रावर किमान दहा हजार प्रेक्षकांना मान्यता दिली होती. मात्र, या वेळी आणिबाणी ही आधीपेक्षा कडक असेल. या कालावधीत टोकियोतील नागरिकांना घरातून बाहेरही पडता येणार नाही जाहीर केलेली ही आणीबाणी 22 ऑगस्टपर्यंत राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने देशात ही चौथी आणीबाणी लावली असून त्याची अधिकृत घोषणाही लवकरच होणार आहे.

जपानमधील एका वृत्तसंस्थेने ऑलिंपिक स्पर्धा आता बंद दरावाजा आडच होतील असे जाहीर केले असून संसर्गाची भिती अजूनही संपली नसल्यामुळे ही होणारी स्पर्धा पूर्ण काळजी घेऊनच घेतली जाणार आहे तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना देशात यापूर्वीच बंदी घातलीय आहे.

जपानमध्ये सध्या कोविडची जवळपास चौथी लाट आली असून आतापर्यंत14 हजार 800 जणांचा मृत्यु झाला आहे. ऑलिंपिक स्पर्धे दरम्यान हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आतापर्यंत जपानमध्ये एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के इतक्याच नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर ऑलिंपिक दरम्यान होणाऱ्या मॅरेथॉन शर्यतीस कुणाही रस्त्यावर गर्दी करू नये असे आवाहनही यापूर्वीच करण्यात आले आहे.

जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी आता स्पर्धक जपान मध्ये येण्यास सुरवात झाली आहे. स्पर्धेसाठी 200 देशातून साधारण 11 हजार खेळाडू जपानमध्ये दाखल होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT