College Women's Cricket Dainik Gomantak
क्रीडा

College Women's Cricket: झांट्ये महाविद्यालयाचा पराभव, ‘डीएम्स’समोर डॉन बॉस्कोचे आव्हान

डीएम्सने मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयास तब्बल १२७ धावांनी नमविले.

किशोर पेटकर

College Women's Cricket: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी आसगावच्या डीएम्स महाविद्यालयासमोर पणजीच्या डॉन बॉस्को महाविद्यालयाचे आव्हान असेल.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामने गुरुवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाले. डॉन बॉस्को महाविद्यालयाने डिचोलीच्या नारायण झांट्ये महाविद्यालयावर ४६ धावांनी विजय नोंदविला. विजयी संघाच्या अनिता चौधरी हिने नाबाद अर्धशतक नोंदविले. डीएम्सने मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयास तब्बल १२७ धावांनी नमविले.

डीएम्सच्या विजयात मेताली गवंडर व पूर्वा भाईडकर यांची कामगिरी निर्णायक ठरली. मेतालीने ५६ चेंडूंत शतक ठोकले, तर पूर्वाने अष्टपैलू (४५ धावा व ५-११) चमक प्रदर्शित केली. डीएम्सने स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदविताना ४ बाद २०५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

डॉन बॉस्को महाविद्यालय: २० षटकांत ३ बाद १७३ (अनिता चौधरी नाबाद ५५, वैष्णवी प्रभू २२, नौफ शेख १-३४, प्रिन्सी च्यारी १-३१) विजयी विरुद्ध नारायण झांट्ये महाविद्यालय: २० षटकांत ८ बाद १२७ (विनिशा नाईक २४, सतलज परब २१, अनीक्षा मोरजकर २-१९, अर्पिता सावंत २-२६).

डीएम्स महाविद्यालय: २० षटकांत ४ बाद २०५ (मेताली गवंडर १००, पूर्वा भाईडकर ४५, माईश्री बांदोडकर २-३८, उमा पंडित १-२३) विजयी विरुद्ध श्री दामोदर महाविद्यालय: २० षटकांत ९ बाद ७८ (वैभवी वायगणकर १०, पूर्वा भाईडकर ५-११, सावित्री कुमावत १-७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT