Chess Championhsip Dainik Gomantak
क्रीडा

Chess Championhsip : आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दियाला पाच पदके; दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदकारवर कोरले नाव

आज दाबोळी विमानतळावर दियाचे आगमन झाले

Sumit Tambekar

मडगाव: श्रीलंकेत झालेल्या आशियाई स्कूल ब्लित्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्ण पदकासह एकूण पाच आंतरराष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या मडगाव येथील दिया दिगंबर सावळ हीचे आज दाबोळी विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

( Diya Sawal of Goa won five medals in the Asian School Blitz Chess Tournament)

सावळ हिने 7 वर्षाखालील गटात वैयक्तिक व सांघिक अशा दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य व एक कांस्य पदक प्राप्त केले होते. आज तिचे दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिच्या स्वागतासाठी गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर यांच्यासह समीर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सचिन आरोलकर, आशेष केणी, सुनील बाळ्ळीकर, पुंडलिक नायक, मुकेश अधिया, अनिल पाटील व दामोदर जांबावलीकर हे उपस्थित होते.

भुवनेश्वर येथील राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत झाली निवड

ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दिया सावळ हिने मुलींत सुवर्ण कमावले , त्याचबरोबर खुल्या गटात एथन वाझ याने रौप्य, तर रुबेन कुलासो याने ब्राँझपदक जिंकले. या कामगिरीमुळे गोव्याचे तिन्ही बुद्धिबळपटू आशियाई आणि जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली होती. यानंतर दियाने पाच पदके आपल्या नावावर केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT