Dinesh Karthik  Dainik Gomantak
क्रीडा

'T20 World Cup आपले अंतिम ध्येय', दिनेश कार्तिकचा मोठा खुलासा

Dinesh Karthik: या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणे हे खरे ध्येय असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात दिनेश कार्तिकने महत्वाची भूमिका निभावली. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणे हे खरे ध्येय असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

दरम्यान, कार्तिकने आपल्या 'फिनिशर'च्या भूमिकेला पूर्ण न्याय देत ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 19 चेंडूत 41 धावा केल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत सहा बाद 190 धावा केल्या. शेवटी कार्तिकची शानदार खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली.

दुसरीकडे, कार्तिकने रविचंद्रन अश्विनशी (Ravichandran Ashwin) बोलताना सांगितले की, “आता छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) चांगली कामगिरी करणे हे अंतिम ध्येय आहे.''

तसेच, दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) पहिल्या T20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. कार्तिकच्या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. दुसरीकडे, भारताने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 122 धावाच करता आल्या, भारताकडून अर्शदीप सिंग, आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 बळी घेतले. टीम इंडियाला 1 ऑगस्टला विंडीजविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT