MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आयपीएलच्या पदार्पण सामन्यात धोनी करणार मोठा रेकॉर्ड, 'या' दिग्गजांच्या क्लबमध्ये...

IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल.

Manish Jadhav

IPL 2023, GT vs CSK: आयपीएल 2023 चा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात सर्वांच्या नजरा धोनी आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाकडे असतील. चेन्नईचा कर्णधार धोनी या सामन्यात मोठा विक्रम करु शकतो.

धोनीच्या नावावर हा मोठा विक्रम!

खरेतर, हा मोठा विक्रम करण्यापासून धोनी फक्त 22 धावा दूर आहे. धोनीने आजच्या सामन्यात 22 धावा केल्या तर IPL मध्ये 5000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरेल. यासाठी धोनीची फलंदाजीही आवश्यक आहे, तरच तो हा पराक्रम करु शकेल. धोनीने आतापर्यंत IPL मध्ये खेळलेल्या 234 सामन्यांमध्ये 4978 धावा केल्या आहेत.

या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश होईल

धोनीने आज 5000 धावांचा आकडा गाठला तर तो अशा 6 क्रिकेटपटूंच्या यादीत सामील होईल, ज्यांनी 5000 किंवा त्याहून अधिक आयपीएल धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

कोहलीने 223 सामन्यात 6624 धावा केल्या आहेत. यानंतर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने 206 सामन्यात 6244 धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने 162 सामन्यात 5881 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने 227 सामन्यात 5879 धावा केल्या आहेत.

सुरेश रैना (Suresh Raina) पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने 205 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत, तर एबी डिव्हिलियर्स सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 184 सामन्यात 5162 धावा केल्या आहेत.

धोनीची आयपीएल आकडेवारी

महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत IPL मध्ये खेळलेल्या 234 सामन्यांमध्ये 4978 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 धावांची आहे. धोनीनेही इतक्याच सामन्यांमध्ये 229 षटकार मारले आहेत. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली 4 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने 2010, 2011, 2018, 2021 चे आयपीएल जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT