Goa Premier League Dainik Gomantak
क्रीडा

Goa Premier League: धेंपो क्लब ‘जीपीएल’ चँपियन

एमसीसी संघाला नमविले ः रोहन, विकास यांची भेदक फिरकी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Premier League रोहन बोगाटी (4-35) व विकास सिंग (4-51) यांच्या भेदक फिरकीसमोर मडगाव क्रिकेट क्लबचा (एमसीसी) दुसरा डाव 113 धावांत गुंडाळून धेंपो क्रिकेट क्लबने गोवा प्रीमियर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धा दिमाखात जिंकली. सामन्याच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सोमवारी त्यांनी 73 धावांनी शानदार विजय नोंदविला.

तीन दिवसीय अंतिम सामना पर्वरी येथील जीसीए मैदानावर झाला. गतवर्षी धेंपो क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, यंदा त्यांनी दुसऱ्या डावातील 186 धावांच्या आघाडीचे यशस्वीपणे संरक्षण केले.

रविवार दिवसअखेर एमसीसी संघाने बिनबाद 4 धावा केल्या होत्या, सोमवारी सकाळी 25 धावसंख्येवर पहिला गडी गमावल्यानंतर एमसीसीने संघाने फलंदाज ठराविक अंतराने गमावले.

रोहनची ऑफब्रेक, तर विकासची डावखुरी फिरकी साह्य करणाऱ्या खेळपट्टीवर वरचढ ठरली. रोहनने सामन्यात 102 धावांत 9 गडी टिपले. सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी केलेला विकास स्पर्धेचा मानकरी ठरला.

बक्षीस वितरण गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक, क्रिकेट प्रशिक्षण व कार्यवाही संचालक प्रकाश मयेकर, जीसीए ज्युनियर क्रिकेट संचालक प्रशांत काकोडे, धेंपो क्लबचे राजेश धेंपे व अनंत कामत यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 157 व दुसरा डाव ः 205 विजयी विरुद्ध मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 176 व दुसरा डाव ः 48.1 षटकांत सर्वबाद 113 (सुमीरन आमोणकर 18, प्रथमेश गावस 18, दर्शन मिसाळ 21, कीथ पिंटो नाबाद 15, विकास सिंग 4-51, रोहन बोगाटी 4-35, यश पोरोब 1-11).

वैयक्तिक कामगिरी

  • सर्वाधिक धावा: दीपराज गावकर ः 5 डावात 65.80च्या सरासरीने 329 धावा

  • सर्वाधिक बळी: दर्शन मिसाळ ः 8 डावात 15.58 ची सरासरी व 2.93 च्या इकॉनॉमीने 33 विकेट

  • सर्वोत्तम अष्टपैलू: विकास सिंग ः 7 डावांत 78.75 च्या सरासरीने 315 धावा, 18.52ची सरासरी आणि 2.58 च्या इकॉनॉमीने 25 विकेट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT