Delhi High Court Bans Unauthorized Broadcasting of ICC Cricket World Cup 2023. Dainik Gomantak
क्रीडा

Cricket World Cup च्या अनधिकृत प्रक्षेपणावर बंदी, हायकोर्टाकडून गैरप्रकाराध्ये गुंतलेल्या वेबसाइट्सना लगाम

Cricket World Cup 2023: विश्वचषक क्रिकेट सामने निःसंशयपणे "अत्यंत लोकप्रिय आहेत, विशेषत: भारतीय उपखंडात" आणि भूतकाळात गैरप्रकाराध्ये गुंतलेल्या वेबसाइट्स, अनधिकृत स्ट्रीमिंग सुरू ठेवण्याची दाट शक्यता आहे.

Ashutosh Masgaunde

Delhi High Court Bans Unauthorized Broadcasting of ICC Cricket World Cup 2023:

दिल्ली उच्च न्यायालयाने आगामी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चे अनधिकृत प्रसारण आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातली आहे.

डिस्ने+ हॉटस्टार प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोवी डिजिटल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दाव्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचा हा आदेश आला आहे.

फिर्यादींनी सांगितले की त्यांच्याकडे 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या विश्वचषक सारख्या विविध आयसीसी इव्हेंटचे टीव्ही आणि डिजिटल अधिकारांसह विशेष जागतिक मीडिया अधिकार आहेत.

फिर्यादी पुढे म्हणाले की, जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धांपैकी एक असल्याने, क्रिकेट विश्वचषक सामन्याशी संबंधीत कंटेंटच्या अनधिकृत प्रसारामध्ये मोठ्या संख्येने वेबसाइट्सचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी सांगितले की, विश्वचषक क्रिकेट सामने निःसंशयपणे "अत्यंत लोकप्रिय आहेत, विशेषत: भारतीय उपखंडात" आणि भूतकाळात गैरप्रकाराध्ये गुंतलेल्या वेबसाइट्स, अनधिकृत स्ट्रीमिंग सुरू ठेवण्याची दाट शक्यता आहे.

“अशा प्रकारे, कोणत्याही वेबसाइट्सना फिर्यादी पक्षाच्या परवानगीशिवाय किंवा परवान्याशिवाय क्रिकेट सामन्याच्या कोणत्याही भागाचे प्रसारण आणि प्रक्षेपण करण्यापासून प्रतिबंधित करणे आवश्यक आहे,” असे न्यायालयाने अलीकडील आदेशात म्हटले आहे.

तथापि, न्यायालयाने असेही म्हटले आहे की, जर नंतर कोणत्याही वेबसाइटवर बेकायदेशीरपणे सामने स्ट्रीम करत असल्याचे आढळले तर, स्टार तात्काळ दूरसंचार विभाग (DoT) आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांना तपशील कळवून संबंधित वेबसाइट ब्लॉक करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT