Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: जस्सी-जडेजानंतर टीम इंडियाला मोठा झटका, हा खेळाडूही जखमी

T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

India Vs South Africa Odi Series: T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या T20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. या खेळाडूने नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. टी-20 विश्वचषकाच्या संघात समावेश होण्यासाठी तो मोठा दावेदार मानला जात होता. या खेळाडूची दुखापत भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी झाला

लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ धावांनी पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दीपक चहरचा (Deepak Chahar) समावेश नव्हता.

संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घेईल

सूत्राने सांगितले की, “दीपक चहरला खेळवण्याचा धोका पत्करायचा की नाही हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल कारण तो टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. पण गरज भासल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. सध्या, जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीला T20 विश्वचषक संघात स्थान देण्यात येणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल अशी अपेक्षा आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT