Dean Elgar PTI
क्रीडा

SA vs IND: निवृत्तीपूर्वी डीन एल्गारचा सेंच्युरियनमध्ये धमाका! शतक करत टीम इंडियाला फोडला घाम

Dean Elgar: भारताविरुद्ध सेंच्युरियनला सुरु असलेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गारने शतकी खेळी केली.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, Dean Elgar Century:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना मंगळवारी (26 डिसेंबर) सुरू झाला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज डीन एल्गारने शानदार खेळ करत शतकी खेळी केली.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारताचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला उतरला. पण दक्षिण आफ्रिकेने एडेन मार्करमची विकेट चौथ्याच षटकात गमावली. मात्र, त्यानंतर डीन एल्गारने डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याला टोनी डी झोर्झीने चांगली साथ दिली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र झोर्झी 28 धावांवर बाद झाला, पाठोपाठ किगन पीटरसनला जसप्रीत बुमराहने माघारी धाडले. मात्र, असे असले तरी एल्गारने आपला चांगला खेळ कायम ठेवला होता.

त्याला डेव्हिड बेडिंगहॅमची साथ मिळाली. हे दोघे डाव पुढे नेत असतानाच शार्दुल ठाकुरने 42 व्या षटकातील पहिला चेंडू नो-बॉल टाकलेला असताना एल्गारने चौकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने 140 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक ठरले.

तसेच एल्गारचे हे कसोटीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे. त्याने 2017 मध्ये ब्लोएमफाँटेनला बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत 116 चेंडूत शतक केले होते. तसेच 2021 मध्ये जोहान्सबर्गला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत 133 चेंडूत शतक केले होते.

दरम्यान, एल्गारने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या सात वेगवेगळ्या ठिकाणी कसोटीत शतके केली आहेत. तो हर्षल गिब्सनंतर असा पराक्रम करणारा एकमेव खेळाडू आहे. गिब्स दक्षिण आफ्रिकेत ८ ठिकाणी खेळला, त्यातील सात ठिकाणी त्याने कसोटीत शतके केली.

एल्गारचा सेंच्युरियनला अखेरचा सामना

दरम्यान, हा एल्गारचा सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेसाठी अखेरचा कसोटी सामना आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच घोषित केले होते की तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT