David Warner
David Warner X
क्रीडा

David Warner: 'टीकाकारांचं तोंड बंद करण्यासाठी...', शतक ठोकताच वॉर्नरचं अनोखं सेलिब्रेशन, पाहा Video

Pranali Kodre

David Warner shuts critics with 26th Test century during Australia vs Pakistan Match at Perth:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थला खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानला शतकी तडाखा दिला आहे.

दरम्यान, याबरोबरच त्याने शतक झळकावल्यानंतर केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय देखील ठरले. विशेष म्हणजे चालू असलेली पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका वॉर्नरची कारकिर्दीतील अखेरची मालिका होती.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीला उतरला. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी सलामीलाच शतकी भागीदारी करत चांगली सुरुवात केली. वॉर्नरने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने ४१ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अमीर जामेलविरुद्ध अप्पर कट मारत चौकार ठोकला आणि त्याचे शतक १२५ चेंडूत पूर्ण केले.

वॉर्नरने शतक केल्यानंतर नेहमीप्रमाणे हवेत उडी मारत त्याचे सेलिब्रेशन केले. मात्र, त्यानंतर त्याने तोंडावर बोट ठेवण्याची कृती करतही सेलिब्रेशन केले.

दरम्यान, या सेलिब्रेशनबद्दल वॉर्नरने दुसऱ्या सत्रानंतर ऍडम गिलख्रिस्टशी बोलताना खुलासा केला. त्याने सांगितले की त्याच्यावर टीका करणाऱ्यांसाठी ते सेलिब्रेशन होते.

तो म्हणाला, 'तुमच्यावर टीका होत असते. पण त्यांना शांत करण्यासाठी धावा करण्यापेक्षा अजून चांगला कोणताच मार्ग नाही.'

जॉन्सनने केलेली जहरी टीका

पाकिस्तानविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी वॉर्नरचा माजी संघसहकारी मिचेल जॉन्सनने त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

जॉन्सनने द वेस्ट ऑस्ट्रेलियनसाठी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये २०१८ साली झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नरचा असलेला समावेशाबद्दल आठवण करून देत म्हटले होते की वॉर्नर हिरोसारख्या निरोपाला पात्र नाही. तो गेल्या काही वर्षांपासून कसोटीत फलंदाजी करताना संघर्ष करत असतानाही त्याला फार महत्त्व दिले गेले.

वॉर्नरचे शतक

दरम्यान, वॉर्नरचे हे कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वे शतक आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके करणारा रिकी पाँटिंगनंतरचा (70 शतके) दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

वॉर्नरचे हे पाकिस्तानविरुद्धचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 वे शतक आहे. तो पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर 12 शतकांसह कुमार संगकारा आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 11 शतकांसह अरविंद डी सिल्वा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT