David Beckham - Sachin Tendulkar ICC
क्रीडा

David Beckham: बेकहॅम पडला वानखेडेच्या प्रेमात! IND vs NZ सेमी-फायनलनंतर म्हणाला, 'स्टेडियममध्ये चालताना...'

World Cup 2023: क्रिकेट की फुटबॉल, कोणत्या चाहत्यांचा आवाज जास्त असतो, याबद्दलही बेकहॅमने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

David Beckham opened up about experience of India vs New Zealand Semi-Final in World Cup 2023 at Wankhede Stadium:

बुधवारी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड संघात पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवला. या सामन्यासाठी इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमनेही हजेरी लावली होती.

बेकहॅम हा UNICEF चा सदिच्छा दूत म्हणून भारतात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेला होता. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (ICC) UNICEF बरोबर क्रिकेटच्या माध्यमातून महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. त्याचमुळे बेकहॅमने वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती.

दरम्यान, या सामन्याबद्दलच्या अनुभवाबद्दल बेकहॅमने बीसीसीआयशी संवाद साधला आहे. याचा संवादाचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की वानखेडेवरील वातावरणाचे त्याने शानदार, प्रचंड उर्जा अशा शब्दात वर्णन केले.

तसेच जर क्रिकेटपटू असता, तर काय बनायला आवडले असते, याबद्दल बोलताना बेकहॅम म्हणाला, 'मी लहान असताना शाळेत क्रिकेट खेळायचो. तेव्हा मला नेहमीच फलंदाज व्हायला आवडायचे. पण मला गोलंदाजी करायलाही आवडायची आणि क्षेत्ररक्षणही. त्यामुळे कदाचीत मी अष्टपैलू झालो असतो, पण तरी मला फलंदाज व्हायला जास्त आवडले असते.'

फुटबॉल चाहत्यांचा की क्रिकेट चाहत्यांचा आवाज जास्त असतो, याबद्दल बेकहॅम म्हणाला, 'मी नेहमीच फुटबॉल चाहते म्हणालो असतो, पण आज इथे आल्यानंतर मला याबद्दल खात्री नाही. कारण वातावरण खूप शानदार होते, चाहत्यांनी उर्जा भरलेली होती. त्यांचा आवाजही खूप होता, त्यामुळे आता मला खात्री नाही.'

वानखेडेवरील अनुभवाबद्दल तो म्हणाला, 'स्टेडियमध्ये प्रवेश करणे शानदार होते आणि जसे मी स्टेडियममध्ये आत चालत होतो, माझ्या अंगावर काटा आला होता. कदाचीत असे झाले, कारण मी सचिनबरोबर चालत होतो. स्टेडियममध्ये तुम्हाला उर्जा जाणवते, जरी सुरुवातीला खूप लोक नसले तरी उर्जा जाणवते.'

भारत दौऱ्याबद्दल बेकहॅम म्हणाला, 'मी पहिल्यांदाच भारतात आलो आणि हा अनुभव मस्त होता. मला माहित नाही की मला भारतात येण्यासाठी इतका काळ का लागला, पण अखेर मी भारतात आलो आहे. मी परत येण्याची आता वाट पाहिल.'

'मी UNICEF बरोबर काम करताना काही लहान मुलांना, प्रतिभाशाली युवांना भेटलो विशेषत: लहान मुलींना भेटलो.त्यांना भेटणे खूप प्रेरणादायी होते. ते जे काही सांगत होते आणि त्यांना जे हवे होते, जे बदलायचे होते, ते प्रेरणा देणारे होते. पण एकूण लोकांचा, लहान मुलांचा, पदार्थांचा आणि स्टेडियममधील उर्जेचा अनुभव, तसेच दिवाळीच्या दरम्यान येथे येणे, तेही क्रिकेट वर्ल्डकप सुरू असताना, यापेक्षा परिपूर्ण काय असू शकते.'

सचिनबरोबरच्या भेटीबद्दल बेकहॅम म्हणाला, 'हे खूप विशेष होते. मी सचिनला पहिल्यांदा विम्बल्डनला भेटलो होतो. तो फक्त फलंदाज म्हणून नाही, तर व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. त्यामुळे त्याच्या शहरात त्याच्याबरोबर वेळ घालवणे माझ्यासाठी विशेष होते.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या होत्या, त्यानंतर 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वाबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT