Daryl Mitchell Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs NZ 2nd Test Day 2: डॅरिल मिशेलने बॅक टू बॅक ठोकली सेंच्युरी

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. न्यूझीलंडने शनिवारी दुस-या दिवशी 4 विकेट्सवर 318 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाचा नाबाद फलंदाज डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले आहे. मिशेलचे हे सलग दुसरे शतक आहे. त्याच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये तीन शतके आहेत. मिशेलने 184 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने कसोटीत आपले शतक पूर्ण केले. यासाठी त्याला 257 मिनिटे लागली. (Daryl Mitchell hits back to back century in England vs new Zealand 2nd test day 2)

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथच्या क्लबमध्ये सामील झाला

कसोटी क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर मिशेल विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टीव्ह स्मिथच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 2016 पासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत दोन शतके ठोकणारा तो चौथा परदेशी फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि शाई होप यांनी हा पराक्रम केला आहे.

दुसरीकडे, मिशेलनंतर टॉम ब्लंडेलने कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावले. त्याने 191 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. ब्लंडेलने आपली तीनही शतके वेगवेगळ्या देशांमध्ये झळकावली आहेत. त्याने आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) शतके ठोकली आहेत.

शिवाय, ब्लंडेलने मिशेलसोबत पाचव्या विकेटसाठी 236 धावांची विक्रमी भागीदारी केली. न्यूझीलंडच्या 405 धावांवर पाचवा फलंदाज म्हणून त्याची विकेट पडली. ब्लंडेलला कर्णधार बेन स्टोक्सने जॅक लीचच्या हाती झेलबाद केले. किवी फलंदाजाने 198 चेंडूत 106 धावांचे शतक झळकावले. न्यूझीलंडने 112 षटकांत 5 बाद 411 धावा केल्या आहेत. मिशेल 228 चेंडूत 127 आणि मायकेल ब्रेसवेल 10 चेंडूत 5 धावांवर खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT