Sail Goa Yachting Dainik Gomantak
क्रीडा

Sail Goa Yachting: डेन, जेरोम यांच्यात चुरस तर महिलांच्या आयक्यू फॉईलमध्ये कात्याचा दबदबा

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Sail Goa Yachting दोना पावला समुद्रात सुरू असलेल्या गोवा यॉटिंग असोसिएशनच्या ‘सेल गोवा’ स्पर्धेच्या पुरुष गटात गोव्याचा डेन कुएल्हो व आर्मी यॉटिंग नोडचा जेरोम कुमार यांच्यात आयक्यू फॉईल प्रकारात जोरदार चुरस आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी डेनने तीनपैकी दोन शर्यती जिंकून एकंदरीत चार गुणांची आघाडी प्राप्त केली.

महिलांच्या आयक्यू फॉईल प्रकारात गोव्याच्या कात्या कुएल्हो हिचा दबदबा शुक्रवारीही कायम राहिला. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या कात्याने दिवसभरातील तिन्ही शर्यती जिंकून आघाडी बळकट केली.

स्पर्धेतील अन्य शर्यतीत, पुरुषांच्या आरएसःएक्स प्रकारात इबाद अली, वेद पाठक व मिथेलेश कुमार यांच्या चढाओढ दिसली. आरएसःवन खुल्या युवा गटात ओडिशाचा नारायण मुंडा व तृष्णा सेलिंग क्लबचा गणेश विश्वकर्मा यांच्यात संघर्ष राहिला.

नारायणने दिवसभरात तीनपैकी दोन शर्यतीत बाजी मारली. ओपन फॉईल गटात अभिनव यादव आणि आदित्य संगवान यांचे सेलिंग उल्लेखनीय ठरले. अभिनवने एका शर्यतीत अव्वल क्रमांक मिळविला.

रेसबोर्ड प्रकारात पुरुष गटात शुक्रवारी तिन्ही शर्यतीत डी. पी. चेन्नया अग्रेसर ठरला. एन. एस. रावत दुसऱ्या, तर कमलापती तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवा गटात आयएनडब्ल्यूटीसी गोवाच्या एन. वाम्शी याने गोव्याच्या आदर्श चुनेकर व विश्वेश यांच्यावर आघाडी राखली.

ग्रँडमास्टर गटात गोव्याच्या गोपाळ अमिन याने दिवसातील तिन्ही शर्यतीत वर्चस्व राखले. त्याने ब्रिगेडियर पी. सी. रॉय व कॅप्टन सुब्रम्हण्यम यांच्यावर आघाडी घेतली. टॉपर क्लास प्रकारात जोगेंदर ठाकूर पहिल्या स्थानी कायम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT