Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: विराट कोहली नाही... बाबर आझम तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह'

Babar Azam In All Three Formats: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या शानदार फलंदाजीने आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Manish Jadhav

Babar Azam In All Three Formats: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या शानदार फलंदाजीने आपली क्षमता सिद्ध केली आहे. बाबरने फार कमी कालावधीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सध्या बाबर तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सध्याच्या तिन्ही फॉरमॅटमधील आयसीसी क्रमवारीत बाबर आझम हा एकमेव खेळाडू आहे, ज्याचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. केवळ फलंदाजच नाही तर कोणताही गोलंदाज बाबर आझमच्या आसपासही नाही.

दरम्यान, सध्याच्या ICC कसोटी क्रमवारीत, बाबर आझम 5 व्या क्रमांकावर आहे, तर ICC रँकिंग ODI मध्ये नंबर 1 आहे. त्याचबरोबर, ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तो 3 व्या क्रमांकावर आहे. बाबर तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये तो पाकिस्तानची कमानही सांभाळत आहे. पाकिस्तानी कर्णधाराशिवाय, तिन्ही फॉरमॅटच्या आयसीसी क्रमवारीत टॉप-10 मध्ये असा कोणताही खेळाडू नाही.

तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या फलंदाजांपैकी तो एक

तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझमचा (Babar Azam) समावेश आहे. बाबरने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 9, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 3 शतके झळकावली आहेत. म्हणजेच बाबरच्या बॅटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 30 शतके झळकली आहेत.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकीर्द

बाबर आझमने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने आतापर्यंत 100 एकदिवसीय सामने खेळले असून 59.17 च्या सरासरीने 5089 धावा केल्या आहेत. यामध्ये 18 शतकांसह बाबरने 26 अर्धशतकेही केली आहेत.

याशिवाय, बाबरने ऑक्टोबर 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत 47 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 85 डावात फलंदाजी करताना त्याने 48.63 च्या सरासरीने 3696 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9 शतकांव्यतिरिक्त 26 अर्धशतकेही झळकली आहेत.

त्याचवेळी, बाबरने सप्टेंबर 2016 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 104 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 41.48 च्या सरासरीने आणि 128.40 च्या स्ट्राइक रेटने 3485 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: 'प्रत्येक वेळी शॅक मालकांवरच कारवाई का'? व्यावसायिकांचा संतप्त सवाल; वस्तुस्थिती तपासण्याची मागणी

Goa Accident: बाईक-टॅंकरचा अपघात, ‘बिट्स’च्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल टँकरचालक अटकेत

Margao: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ अडकला कुठे? आमदार सरदेसाईंचा सवाल; 'प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपल्याचा दावा

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT