Tushar Deshpande Dainik Gomantak
क्रीडा

Tushar Deshpande Engagement: ऋतुराजनंतर CSK च्या वेगवान गोलंदाजानंही गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाजाने साखरपुडा केला असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Pranali Kodre

Tushar Deshpande Engagement: भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ऋतुराज गायकवाड आणि प्रसिद्ध कृष्णा हे भारताचे क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेही लवकरच लग्नबंधनात अडणार आहे.

त्याने त्याची बालपणीची मैत्रीण नाभाबरोबर साखरपुडा केला आहे. त्याने साखरपुडा उरकला असल्याचे सर्वात आधी त्याचा चेन्नई सुपर किंग्स संघातील संघसहकारी शिवम दुबेने १२ जूनला इंस्टाग्रामला पोस्ट केल्याने समोर आले होते.

त्यानंतर आता तुषारनेच सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तुषारने नाभासोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की '12.06.23 तिला माझी शाळेतील क्रशपासून आता माझी होणारी पत्नी (FIANCÉ) म्हणून बढती मिळाली आहे.'

तुषारच्या होणाऱ्या पत्नीचे नाव नाभा गद्दमवार आहे. ती आर्टिस्ट असून ती गिफ्ट्सही डिझाईन करते. ती आणि तुषार बालपणापासून एकमेकांना ओळखतात. आता त्यांनी त्यांच्या नात्याला नवी ओळख दिली आहे.

आयपीएल 2023 दरम्यान देखील नाभा तुषारला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

तुषारची कारकिर्द

तुषार आयपीएलमध्ये सध्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असला, तरी तो देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळतो. तो मुंबईकडून वरिष्ठ संघात येण्यापूर्वी 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे.

तुषारने त्याच्या कारकिर्दीत 29 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 80 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 34 लिस्ट ए सामने खेळले असून 35 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 59 टी20 सामने खेळले असून 83 विकेट्स घेतल्या आहेत.

तुषार आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.

तुषार आत्तापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्सच्या आधी दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत तीन हंगाम खेळले असून 23 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT