Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: ईशान किशन म्हणतोय, '...तर 300 धावाही करू शकलो असतो'; Video

ईशान किशनने बांगलादेशविरुद्ध द्विशतक केले आहे. तो वनडे द्विशतक करणारा सातवा खेळाडू आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan: शनिवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने 227 धावांनी विजय मिळवला आणि व्हाईटवॉश टाळला. भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा राहिला तो ईशान किशनचा. त्याने विक्रमी द्विशतकी खेळी केली. या विजयानंतर त्याने त्याच्या फलंदाजीबद्दल प्रतिक्रियाही दिली.

ईशानने या सामन्यात 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची खेळी केली. त्याने 126 चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो सर्वात जलद वनडे द्विशतक करणाराही खेळाडू ठरला. विशेष म्हणजे त्याने भारताच्या डावातील 35 षटके पूर्ण होण्यापूर्वीच हे द्विशतक केले होते. तो 36 व्या षटकात बाद झाला.

त्याबद्दल तो म्हणाला, 'फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली होती. माझा हेतू स्पष्ट होता. चेंडू जर माझ्या क्षेत्रात असेल, तर मी तो मारणार. माझे नाव दिग्गजांच्या पंक्तीत आलेले पाहून मला छान वाटत आहे. मला अजूनही वाटतंय की 15 षटके बाकी होती. मी 300 धावाही करू शकलो असतो.'

ईशानने त्याच्या खेळीसाठी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनाही श्रेय दिले. तो म्हणाला, 'विराट भाईबरोबर फलंदाजी करणे चांगले होते. त्याला खेळ चांगला समजतो. मी जेव्हा नव्वदीत होतो, तेव्हा तो मला शांत करत होता. मला षटकार मारायचा होता. पण त्याने मला सांगितले की हे माझे पहिलेच शतक आहे, तर एकेरी-दुहेरी धावा काढ.'

'माझे सूर्या भाईबरोबरपण बोलणे झाले होते. त्याने मला सांगितले होते की जेव्हा तू सामन्याआधी फलंदाजी करशील, तेव्हा तुला चेंडू नीट दिसेल. मी खूप दबाव घेतला नाही. मला फक्त संधीचा फायदा घ्यायचा होता.'

ईशानबरोबर विराटनेही या सामन्यात शतकी खेळी केली. विराट आणि ईशान यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारीही झाली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 409 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशला 410 धावांचा पाठलाग करताना सर्वबाद 182 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

SCROLL FOR NEXT