Japan vs Costa Rica Dainik Gomantak
क्रीडा

Japan vs Costa Rica: जर्मनीला पराभूत करणाऱ्या जपानला कोस्टारिकाकडून पराभवाचा धक्का

1-0 गोलफरकाने मात; ग्रुप ई मध्ये राऊंड ऑफ 16 साठी होणार चुरस

Akshay Nirmale

Japan vs Costa Rica: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी ग्रुप ई मधील सामन्यात कोस्टारिकाने जपानला पराभवाचा धक्का दिला. कोस्टारिकाच्या किशर फुल्लर याने 81 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. त्यानंतर अखेरपर्यंत जपानला ही आघाडी तोडता आली नाही. कोस्टारिकाने 1-0 असा विजय मिळवला.

(FIFA World Cup 2022)

या विजयामुळे ग्रुप ई मधील समीकरणे बिघडणार आहेत. आता या ग्रुपमधून राऊंड ऑफ 16 मध्ये जाण्यासाठी चुरस असणार आहे. कारण यापुर्वी जपानने जर्मनीला पराभूत केले होते तर आता जपानला कोस्टारिकाने पराभूत केले आहे. तर कोस्टारिकाला पहिल्या सामन्यात स्पेनने पराभूत केले होते.

या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. पासेसच्या अचुकतेमध्ये जपान वरचढ होता. धसमुसळ्या खेळाबद्दल दोन्ही संघातील प्रत्येकी तीन खेळाडुंना यलो कार्ड दाखविण्यात आले. जपानला पाच कॉर्नर किक मिळाल्या, पण त्याचा लाभ घेण्यात जपानच्या खेळाडुंना यश आले नाही. कोस्टारिकाला एकही कॉर्नर किक मिळाली नाही.

तत्पुर्वी पुर्वाधात कुठल्याही संघाला गोल करता आला नाही. दोन्ही संघात टक्कर पाहायला मिळाली. चेंडुवरील नियंत्रणात कोस्टारिकाचा संघ जपानपेक्षा वरचढ राहिला. पुर्वार्धात जपानपेक्षा कोस्टारिकानेच गोलसाठी सर्वाधिक प्रयत्न केले. पण गोल करण्यात यश आले नाही.

जपानने या स्पर्धेतील गत सामन्यात चारवेळा विश्वविजेत्या जर्मनीला 2-1 असे पराभूत केले होते. तर कोस्टारिकाचा स्पेनविरोधात 7-0 असा पराभव झाला होता. फिफा रँकिंगमध्ये जपान 24 तर कोस्टा रिका 31 व्या स्थानी आहे.

2014 मध्ये उरुग्वे आणि इटलीला पराभूत केल्या नंतरपासून कोस्टारिका या स्पर्धेत एकही विजय मिळवता आलेला नाही. वर्ल्डकपमधील गेल्या सात सामन्यांमध्ये कोस्टारिका तीन सामन्यात पराभूत झाला आङे तर चार सामने अनिर्णित राहिले आहेत. यातील पाच सामन्यात कोस्टारिकाला गोलदेखील करता आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT