निसर्ग नागवेकर, जीवन चित्तेम Dainik Gomantak
क्रीडा

Cooch Behar Trophy: संयमी निसर्ग, जीवनमुळे गोव्याला मिळाले 3 गुण

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy: त्रिपुराने तीनशे धावांचे आव्हान दिल्यानंतर चांगली सुरवात केलेल्या गोव्याने 24 धावांत 4 विकेट गमावल्या व ते पराभवाच्या छायेत आले. प्रतिकुल परिस्थितीत निसर्ग नागवेकर व जीवन चित्तेम यांनी संयमी फलंदाजीसह किल्ला लढविला.

त्यामुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे यजमानांना तीन गुण मिळाले.

स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामना कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. अगोदर मुंबई व चंडीगडविरुद्ध पराभूत झालेल्या गोव्याने सोमवारी मिळालेल्या तीन गुणांसह गुणतक्त्यात खाते उघडले.

त्रिपुरालाही यापूर्वीच्या दोन्ही लढतीत मोठे पराभव पत्करावे लागले होते. गोव्याविरुद्ध अनिर्णित लढतीत त्यांना एक गुण मिळाला. गोव्याचा पुढील सामना पंजाबमध्ये 8 डिसेंबरपासून त्या राज्यात खेळला जाईल.

त्रिपुराच्या सप्तजितचे शतक

गोव्याने त्रिपुरावर पहिल्या डावात 35 धावांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी काल 82 धावांवर नाबाद असलेल्या सप्तजित दास याने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत शतक पूर्ण केले. तो 101 धावांवर नाबाद राहिला.

त्या बळावर त्रिपुराने दुसरा 9 बाद 334 धावांवर घोषित करून एकूण 299 धावांची आघाडी प्राप्त केली. गोव्याने सामन्याच्या अखेरच्या दिवसअखेर 80 षटकांत 5 बाद 201 धावा करून सामना अनिर्णित राखला.

गोव्याचा डाव घसरला

गोव्याला दुसऱ्या डावात वीर यादव (35) व शंतनू नेवगी (52) यांनी दमदार सुरवात करून देताना 78 धावांची सलामी दिली. जम बसत असताना बाद होण्याची वीर याची सवय कायम राहिली. नंतर शंतनू याने यश कसवणकर (22) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली.

मात्र अर्धशतकानंतर लगेच शंतनू याने एकाग्रता गमावली. त्याने 113 चेंडूंतील खेळीत 7 चौकार मारले. नंतर यश, दिशांक मिस्कीन (7) व दर्पण पागी (0) यांना झटपट गमावल्यामुळे गोव्याची 5 बाद 137 धावा अशी घसरगुंडी उडाली.

सामना वाचविणारी भागीदारी

निसर्ग नागवेकर व जीवन चित्तेम जोडी एकत्रित आली तेव्हा गोव्याच्या डावातील 27.1 षटके आणि पाच विकेट बाकी होत्या. या जोडीने कमालीची एकाग्रता आणि संयम प्रदर्शित करताना सामना वाचविणारी भागीदारी केली. त्यामुळे पराभवाचे संकटही दूर झाले.

निसर्गने 130 चेंडूंचा सामना करताना पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. जीवनही नाबाद राहिला. त्याने 91 चेंडूत सात चौकारांसह 30 धावा केल्या. या जोडीने 166 चेंडू किल्ला लढविताना सहाव्या विकेटसाठी 64 धावांची महत्त्वपूर्ण अभेद्य भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव ः 180 व दुसरा डाव (7 बाद 287 वरून) ः 103.2 षटकांत 9 बाद 334 घोषित (सप्तजित दास नाबाद 101, बिशाल शर्मा 11, अर्कजित रॉय 16, पुंडलिक नाईक 20-2-71-2, युवराज सिंग 27-2-115-2, कौस्तुभ पिंगुळकर 12.2-2-41-1, शिवांक देसाई 15-5-27-3, यश कसवणकर 24-9-54-0, शंतनू नेवगी 4-0-15-1).

गोवा, पहिला डाव ः 215 व दुसरा डाव ः 80 षटकांत 5 बाद 201 (वीर यादव 35, शंतनू नेवगी 52, यश कसवणकर 22, निसर्ग नागवेकर नाबाद 42, दिशांक मिस्कीन 7, दर्पण पागी 0, जीवन चित्तेम नाबाद 30, सप्तजित दास 28-2).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT