Commonwealth Games 2022 India hockey Twitter
क्रीडा

CWG 2022: पुरुष हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0ने मात

भारताकडून हरमनप्रीतने दोन गोल केले. तर अमित, ललित उपाध्याय, गुरजंत आणि मनदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022 India: कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सहाव्या दिवशी भारताने कॅनडाविरुद्ध शानदार प्रदर्शन करत पुरुष हॉकी स्पर्धा जिंकली. टीम इंडियाने हा सामना 8-0 ने जिंकला. भारताकडून हरमनप्रीतने दोन गोल केले. तर अमित, ललित उपाध्याय, गुरजंत आणि मनदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला. आणि आकाशदीपने दोन गोल केले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरपासूनच दबाव कायम ठेवत कॅनडाविरुद्ध सामना खेळण्यासाठी सज्ज झाला. भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली. उपकर्णधार हरमनप्रीतने संघासाठी दोन गोल केले. तर आकाशदीप सिंगनेही दोन गोल केले. याशिवाय ललित उपाध्यायने चमकदार कामगिरी करताना एक गोल केला. तर अमित रोहिदासने एक गोल केला. (Commonwealth Games 2022 India)

राष्ट्रकूल स्पर्धेत भारत पदक यादीत सहाव्या स्थानावर आहे. आतापर्यंत टीम इंडियाने 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकेही जिंकली आहेत. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. म्हणजे एकूण 106 पदके जिंकली आहेत. यामध्ये 42 सुवर्णपदक आणि 32-32 रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. तर इंग्लंड 86 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 26 पदके जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT