Coco Gauff Dainik Gomantak
क्रीडा

US Open: 19 वर्षीय कोको गॉफ नवी चॅम्पियन, फायनलमध्ये सबालेंका पराभूत

Coco Gauff: अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवत 19 वर्षीय कोको गॉफने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅमही जिंकले.

Pranali Kodre

Coco Gauff Win US Open 2023:

शनिवारी अमेरिकेच्या 19 वर्षीय कोको गॉफने अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. हे तिचे कारकिर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. तिला या विजेतेपदाबद्दल जवळपास 25 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली.

कोको गॉफने अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित आर्यना सबालेंकाला पराभूत केले. 2 तास 6 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात कोको गॉफने सबालेंकाला 2-6, 6-3, 6-2 अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले.

गॉफ या 21 व्या शतकात अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली किशोरवयीन (Teenager) टेनिसपटू आहे, तसेच एकूण तिसरी टेनिसपटू आहे. यापूर्वी अखेरचे 1999 साली सेरेना विलियम्सने किशोवयीन असताना अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर कोको गॉफला आनंदाश्रू अनावर झाले होते. तिने काही वर्षांपूर्वी सेरेनाला अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकताना पाहिले होते, आता ती स्वत: ग्रँडस्लॅम विजेती झाल्याने तिला आनंद गगनात मावेनासा झाला होता.

यावेळी तिचे कुटुंबिय देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. यावेळी तिला विजेतेपद जिंकलेले पाहून तिच्या वडिलांनीही आनंदश्रू आवरता आले नव्हते.

दरम्यान अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित गॉफ आणि सबालेंका या दोघींकडूनही काही चूका झाल्या होत्या. पहिल्या सेटमध्ये गॉफ संघर्ष करत होती. तर पुढील आठवड्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येणारी सबालेंकाने सुरुवात चांगली केली होती.

पहिल्या सेटमध्ये सबालेंकाने 2-0 अशी आघाडी घेतलेली. पण गॉफने पुनरागमन करत 2-2 अशी बरोबरी साधली. पण नंतर सबालेंकाने तिचा खेळ उंचावला आणि पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये गॉफने चांगले पुनरागमन केले. तिने कमी चूका करताना ती खेळात कायम राहिल याची काळजी घेतली. तिने हा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये गेला.

तिसऱ्या सेटमध्येही गॉफने लय कायम राखली आणि सबालेंकाला वरचढ होऊ दिले नाही. तिने 4-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सबालेंकाने प्रतिकार केला. मात्र, गॉफने मिळवलेली पकड ढिली होऊ न देता सेट जिंकत सामना जिंकला आणि आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT