Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

Coach Changed: मालिका सुरु होण्यापूर्वीच बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय, संघाऐवजी प्रशिक्षक...

PCB Changed Coach, PAK vs AFG: मालिका सुरु होण्याआधीच कर्णधार, प्रशिक्षक सगळे बदलले तर क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल.

Manish Jadhav

PCB Changed Coach, PAK vs AFG: मालिका सुरु होण्याआधीच कर्णधार, प्रशिक्षक सगळे बदलले तर क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे केले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका सुरु होण्यापूर्वीच पीसीबीने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. आता या मालिकेत संघ नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.

या अनुभवी खेळाडूला मुख्य प्रशिक्षक केले

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) आगामी T20 मालिकेसाठी संघाच्या सपोर्ट स्टाफची नावे जाहीर केली आहेत.

पीसीबीने माजी वेगवान गोलंदाज उमर गुल यांची गोलंदाजी प्रशिक्षक आणि अब्दुल रहमान यांची अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मोहम्मद युसूफ हे फलंदाजी प्रशिक्षक आणि अब्दुल मजीद क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

बाबर आझमची कर्णधारपदावरुन हकालपट्टी

दरम्यान, सिलेक्टर्संनी सोमवारी शादाब खानची (Shadab Khan) पाकिस्तानच्या T20 संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली असून सर्व प्रकारचा कर्णधार बाबर आझमसह पाच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

24 वर्षीय शादाब खानने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 84 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 98 बळी घेत एकूण 476 धावा केल्या. त्याने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

ही मालिका 24 मार्चपासून सुरु होणार आहे

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 24 मार्चपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा टी-20 सामना 26 मार्चला तर तिसरा आणि अंतिम सामना 27 मार्चला खेळवला जाईल. तिन्ही सामने शारजाह येथे होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT