Churchill Brothers Dainik Gomantak
क्रीडा

चर्चिल ब्रदर्सची अपराजित मालिका खंडित

आय-लीग : मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या विजयात जोसेफचे दोन गोल

किशोर पेटकर

पणजी : मार्कुस जोसेफ याने उत्तरार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर मोहम्मेडन स्पोर्टिंगने चर्चिल ब्रदर्सची आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका खंडित केली. कोलकात्यातील कल्याणी स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात गोव्यातील संघाला अंतिम टप्प्यात दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

सामन्याच्या 83 व्या मिनिटास ताजिकिस्तानी खेळाडू कोमरोन तुर्सुनोव याला रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे चर्चिल ब्रदर्सचा एक खेळाडू कमी झाला. त्यापूर्वी, गोलशून्य पूर्वार्धानंतर 54व्या मिनिटास त्रिनिदाद-टोबॅगोच्या मार्कुस जोसेफ याने भेदक हेडिंग साधत मोहम्मेडन स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली होती. नंतर त्याने 90+6व्या मिनिटास रिबाऊंड फटक्यावर गोल करून कोलकात्यातील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचा हा स्पर्धेतील दहावा विजय ठरला. त्यामुळे 16 सामन्यानंतर त्यांचे 34 गुण झाले व दुसरा क्रमांक कायम राहिला. अव्वल स्थानावरील गोकुळम केरळापेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत.

सलग नऊ सामने (सात विजय, दोन बरोबरी) अपराजित राहिल्यानंतर चर्चिल ब्रदर्सला पराभव स्वीकारावा लागला. एकंदरीत त्यांचा हा पाचवा पराभव ठरला. त्यामुळे 16 लढतीनंतर 27 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी कायम राहिले. चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक शिल्टन पॉल याने दक्षता प्रदर्शित केली नसती, तर मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या विजयात गोलफरक वाढला असता. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा मोहम्मेडन स्पोर्टिंगने काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT