I-League Football Match Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: चर्चिल ब्रदर्सची मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर मात

अब्दौलाये साने याचा इंज्युरी टाईम गोल निर्णायक

किशोर पेटकर

I-League Football: चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर 2-1 फरकाने मात करून गुणतक्त्यातील स्थिती सुधारली. सामना कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर झाला.

सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास सुपर सब खेळाडू सेनेगलच्या अब्दौलाये साने याने केलेला गोल चर्चिल ब्रदर्ससाठी निर्णायक ठरला. त्यामुळे त्यांना यंदा स्पर्धेत सहावा विजय नोंदविणे शक्य झाले.

16 लढतीनंतर गोव्यातील संघाचे आता 23 गुण झाले असून त्यांना चौथा क्रमांक मिळाला. मोहम्मेडनला सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 16 लढतीनंतर 17 गुण व नववा क्रमांक कायम राहिला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही संघांना प्रत्येकी 10 खेळाडूंसह खेळावे लागले.

71व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सचा कर्णधार मोमो सिस्से याला थेट रेड कार्ड दाखविण्यात आले, तर 73व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे मोहम्मेडनच्या साईरुआतकिमा याला मैदान सोडावे लागले.

सामन्याच्या 42व्या मिनिटास अफगाणिस्तानच्या शरिफ मुखम्मद याच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने आघाडी घेतली. 90व्या मिनिटास बदली खेळाडू अबिओला अदेदेजी दौडा याने केलेल्या गोलमुळे मोहम्मेडन स्पोर्टिंगला बरोबरी साधता आली. सामन्याच्या 80व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या अब्दौलाये याने 90+4व्या मिनिटास संधीचे सोने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT