I-League  Dainik Gomantak
क्रीडा

I-League : पराभवामुळे चर्चिल ब्रदर्सची घसरण

आय-लीग : राजस्थान युनायटेडचा दोन गोलने चमकदार विजय

Kishor Petkar

I-League : चर्चिल ब्रदर्सची आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील घसरण कायम राहिली. त्यांना राजस्थान युनायटेडकडून 2-0 फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे चक्क बाराव्या क्रमांकावर जावे लागले. सामना सोमवारी पश्चिम बंगालमधील नैहाटी स्टेडियमवर झाला.

राजस्थान युनायटेडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अलोसियस मुथाय्यन याने दोन्ही गोल चार मिनिटांच्या फरकाने नोंदविले. त्याने पहिला गोल 34व्या, तर दुसरा गोल 38व्या मिनिटास केला.

राजस्थान युनायटेडने सलग चौथ्या सामन्यात अपराजित राहताना गोल न स्वीकारण्याचा पराक्रम साधला. आय-लीग स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या संघाचा हा पाच लढतीतील दुसरा विजय ठरला व त्यांचे आठ गुण झाले. चर्चिल ब्रदर्सला चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

अगोदरच्या लढतीत चर्चिल ब्रदर्सने अव्वल स्थानावरील मोहम्मेडन स्पोर्टिंगला पराभवाचा धक्का दिला होता, परंतु सोमवारी त्यांना सूर गवसला नाही. अर्ध्या तासाच्या खेळानंतर राजस्थान युनायटेडने आघाडी घेतली. 17 वर्षीय खेळाडू ग्यामार निकुम याच्या शानदार पासवर पेद्रो मांझी याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर अलोसियस याने चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक शिल्टन पॉल याला चकविले. चार मिनिटानंतर अलोसियस याने आणखी एक गोल करत राजस्थान युनायटेडची स्थिती भक्कम केली. मांझी याने चर्चिल ब्रदर्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत संधी प्राप्त केली. यावेळी प्रीतम सिंग याच्या असिस्टवर अलोसियस याने गोल करण्याचा काम पार पाडले.

उत्तरार्धात चर्चिल ब्रदर्सने पिछाडी भरून काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण त्यांना सदोष खेळामुळे यश लाभले नाही. साठाव्या मिनिटास त्यांच्या केनेथ इकेचुक्वू याचा चांगला प्रयत्न राजस्थानचा गोलरक्षक भास्कर रॉय याने उधळून लावला. सामन्यातील शेवटची चार मिनिटे बाकी असताना राजस्थान युनायटेडच्या पेद्रो मांझी याला गोल करण्याची चांगली संधी होती, पण तो चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकाला गुंगारा देऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT