Cheteshwar Pujara Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (WTC Final) सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीवर आहेत. या ब्रेकनंतर भारताचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरु होणार आहे.
डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे 12 ते 16 जुलै दरम्यान पहिली कसोटी खेळली जाणार आहे. त्याचवेळी, दुसरी कसोटी 20 ते 24 जुलै दरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवली जाईल.
या दोन कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दौऱ्याच्या मध्यातच दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी यूकेला रवाना होईल.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टीम इंडियाकडून फक्त टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळतो. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनलमध्ये पुजाराला केवळ 14 आणि 27 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत त्याने आपले करिअर वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांनंतर चेतेश्वर पुजारा पुन्हा कौंटी क्रिकेटमध्ये सक्रीय होणार आहे. पुजाराने WTC फायनलपूर्वी ससेक्ससाठी सहा सामने खेळले आहेत, जिथे त्याने आठ डावात तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
पुजाराने यंदाच्या कौंटी मोसमाची धमाकेदार सुरुवात केली. चेतेश्वर पुजाराने एप्रिलमध्ये डरहमविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. यानंतर त्याने ग्लुसेस्टरशायर आणि वूस्टरशायरविरुद्धही शतकी खेळी खेळली होती.
ससेक्ससाठी खेळलेल्या सहा सामन्यांमध्येही तो कर्णधार होता जिथे त्याने 68.12 च्या सरासरीने 545 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराही रॉयल लंडन कपमध्ये खेळताना दिसू शकतो.
चेतेश्वर पुजारा हा टेस्ट फॉरमॅटमधील टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. चेतेश्वर पुजाराला कसोटीत संघाची वॉल म्हटले जाते. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत.
या सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराने 43.61 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 35 अर्धशतके आणि 19 शतके झळकली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.