Goa Chess committee  Kishor Petkar
क्रीडा

राज्यातील शालेय बुद्धिबळात चुरस

बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेनिमित्त 15 वर्षांखालील स्पर्धेला सुरवात

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड प्रसारांतर्गत घेण्यात आलेल्या गोवा राज्यस्तरीय 15 वर्षांखालील मुलगे आणि मुलींच्या शालेय पातळीवरील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी चुरस दिसली. कुजिरा-बांबोळी येथे डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय संकुलात स्पर्धा सुरू आहे.

(chess competition in school at goa state)

पुढील महिन्यात चेन्नई येथे बुद्धिबळ ऑलिंपियाड होईल. त्यानिमित्त तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि गोवा राज्य बुद्धिबळ अस्थायी समितीच्या मान्यतेने आणि डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली आहे.

स्पर्धेच्या चौथ्या फेरीअंती मुलांच्या गटात व्हिवान बाळ्ळीकर, जॉय काकोडकर, साईरुद्र नागवेकर व एड्रिक वाझ या चौघांनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. कविश बोरकर, एथन वाझ, अनिकेत एक्का, अभीर प्रभू, आरव चोपडेकर व मयुरेश देसाई यांचे प्रत्येकी साडेतीन गुण असून ते संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत. याशिवाय 22 खेळाडूंचे प्रत्येकी तीन गुण आहेत.

मुलींत नेत्रा सावईकर व अस्मिता रे यांनी चारही डाव जिंकून संयुक्त अव्वल क्रमांक मिळविला आहे. सानी गावस व जेनिसा सिक्वेरा यांचे प्रत्येकी साडेतीन गुण आहेत. 11 खेळाडूंनी प्रत्येकी तीन गुणांची नोंद केली आहे.

स्पर्धेचे उद्‍घाटन स्पर्धा संचालक महेश कांदोळकर, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, निमंत्रक सचिन आरोलकर, तसेच सागर साकोर्डेकर, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, आतिश आंगले, नंधिनी सारिपल्ली-म्हामल यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेत मुलांत 128 , तर मुलींत 57 खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धेतील बाकी पाच डाव रविवारी खेळले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT