बोझिदार बँडोविच Dainik Gomantak
क्रीडा

चेन्नईयीनचा आत्मविश्वास उंचावला; नॉर्थईस्टविरुद्ध आज सामना

दोन वेळच्या माजी विजेत्या संघाची उद्या सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लढत होईल.

दैनिक गोमन्तक

पणजी: मोहिमेची सुरवात तीन गुणांसह करणे मानसिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते आणि आत्मविश्वासही बळावतो, असे सांगत चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक बोझिदार बँडोविच यांनी इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात आणखी विजय नोंदविण्याचा आशावाद व्यक्त केला. दोन वेळच्या माजी विजेत्या संघाची उद्या सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लढत होईल.

चेन्नईयीनने मागील लढतीत हैदराबाद एफसीला चुरशीच्या लढतीत १-० फरकाने हरविले. व्लादिमिर कोमन याने पेनल्टी फटक्यावर केलेला गोल निर्णायक ठरला होता. खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील गुवाहाटी नॉर्थईस्ट युनायटेड संघ स्पर्धेत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यांना बंगळूर एफसीकडून २-४ फरकाने हार पत्करावी लागली, नंतर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. सध्या चेन्नईयीनचे एका लढतीतून तीन गुण असून नॉर्थईस्टच्या खाती दोन लढतीनंतर एक गुण आहे.

नॉर्थईस्ट युनायटेडने अजून विजय नोंदविला नसला, तरी चेन्नईयीनचे प्रशिक्षक त्यांना कमी लेखण्यास तयार नाहीत. उद्याचा सामना सोपा नसेल. आम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षमपणे पूर्ण शिस्तीत खेळावे लागेल, असे बँडोविच यांनी नमूद केले.

आमने-सामने

- एकूण सामने: 14, चेन्नईयीन विजयी: 3, नॉर्थईस्ट विजयी: 6, बरोबरी: 5

- गोल नोंदविले: चेन्नईयीन: 21, नॉर्थईस्ट: 25

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT