CSK vs GT Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 विजेत्याची प्रतिक्षा लांबली! उद्या रंगणार चेन्नई - गुजरातचा महामुकाबला; वाचा नक्की काय झालं

आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम सामना पावसाच्या अडथळ्यामुळे राखीव दिवशी खेळवली जाणार आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Gujarat Titans, IPL Final 2023 postponed for reserve day: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जाणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण आता हा सामना पावसामुळे सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

रविवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये सातत्याने पावसाच्या सरी कोसळत होत्या. 11 वाजेपर्यंत पाऊस काहीसा थांबलेला. पण त्यानंतर सामना खेळवण्यासाठी मैदान योग्य स्थितीत नव्हते. मैदान ओले असल्याने अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी खेळवण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

त्यामुळे आता सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. तसेच त्याआधी नाणेफेक होईल. तसेच सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांना त्यांची तिकिट्स नीट ठेवण्याची विनंती करण्यात आली असून या तिकिट्सनुसारच राखीव दिवशीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार आहे.

दरम्यान, जर उद्याही पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर  गुणतालिकेत गुजरात टायटन्स चेन्नईच्या पुढे अव्वल स्थानावर असल्याने त्यांना विजेते घोषित केले जाईल.

अंबाती रायुडूचा अखेरचा सामना

हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज अंबाती रायुडूचा अखेरचा आयपीएल सामना असणार आहे. तो या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अंबाती रायुडू 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याने मुंबई इंडियन्सकडून 2013, 2015 आणि 2017 मध्ये, तर चेन्नई सुपर किंग्सकडून 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

चेन्नईला पाचवे, तर गुजरातला दुसऱ्या विजेतेपदाची आस

दरम्यान, या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स खेळणार असून गुजरात टायटन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद जिंकले, तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरातने विजेतेपद जिंकले, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.

चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच गुजरातने गेल्यावर्षी पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT