Chennai Super Kings  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेपॉकमध्ये चेन्नईने विजय मिळवून केले पुनरागमन, लखनऊचा 12 धावांनी पराभव

CSK vs LSG IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सहावा सामना सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

CSK vs LSG IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सहावा सामना सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने लखनऊ संघाला 218 धावांचे लक्ष्य दिले होते, जे लखनऊ संघाला गाठता आले नाही.

आयपीएल 2023 मधील CSK चा हा पहिला विजय आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक स्टार खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच CSK ने सामना जिंकला.

लखनऊची फलंदाजी

लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी डावाच्या सुरुवातीला धमाकेदार फलंदाजी केली. काइल मेयर्स आणि केएल राहुलने (KL Rahul) तूफानी फटकेबाजी केली, परंतु मेयर्स बाद होताच लखनऊची फलंदाजी कोलमडली. मेयर्सने 22 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली.

त्याचवेळी, दीपक हुडाने 2 तर कृणाल पांड्याने 9 धावा केल्या. या खेळाडूंना सामन्यात प्रभाव पाडण्यात अपयश आले.

मार्कस स्टॉइनिसने 21 धावांचे योगदान दिले. तर निकोलस पूरनने 32 धावांची शानदार खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली

चेन्नई सुपर किंग्जकडून मोईन अलीने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 26 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय, त्याने फलंदाजीतही 19 धावा काढल्या. त्याचवेळी, तुषार देशपांडे आणि मिचेल सँटनरने 1-1 विकेट घेतली.

सीएसकेने 218 धावांचे लक्ष्य दिले

चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शानदार भागीदारी केली. गायकवाडने 57 आणि कॉनवेने 47 धावा केल्या.

त्याचवेळी, शिवम दुबेने 27 धावांचे योगदान दिले. अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी केली. रायुडूने 27 तर धोनीने 12 धावा केल्या.

या खेळाडूंमुळे चेन्नईचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला. लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants) मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी 3-3 बळी घेतले. त्याचवेळी आवेश खानला 1 बळी मिळाला.

चेन्नईच्या मैदानावर असा विक्रम आहे

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर CSK संघाचा विक्रम मोठा आहे. या मैदानावर सीएसकेची विजयाची टक्केवारी जवळपास 80 आहे.

संघाने येथे 40 सामने जिंकले असून 16 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. सीएसकेने या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 26 सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करताना 14 वेळा विजय मिळवला आहे. IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात CSK ला गुजरात टायटन्स विरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT