Sunil Gavaskar | MS Dhoni
Sunil Gavaskar | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL Viral Video: जेव्हा खुद्द गावसकर बनतात कॅप्टनकूलचे फॅन, पळत ऑटोग्राफ घेतानाचा स्पेशल मोमंट कॅमेऱ्यात कैद

Pranali Kodre

MS Dhoni signs autograph for Sunil Gavaskar: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) झालेल्या या सामन्यात कोलकाताने ६ विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी सामन्यानंतर चेन्नईने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हा चेन्नईने आयपीएल २०२३ हंगामातील घरच्या मैदानावरील म्हणजेच चेपॉक स्टेडियमवरील अखेरचा साखळी सामना होता. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसह संपूर्ण संघाने चेपॉक स्टेडियमची फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले. यावेळी खेळाडूंनी चाहत्यांकडे संघाच्या जर्सी फेकल्या. त्याचबरोबर स्वाक्षरी केलेले टेनिस बॉलही चाहत्यांना भेट दिले.

गावसकर बनले धोनीचे फॅन

याच दरम्यान समालोचन करणारे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर पळत धोनीकडे आले आणि त्यांनी पेन धोनीसमोर करत त्याला त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली. धोनीनेही ही विनंती मान्य करत त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी दिली. नंतर त्यांनी गळाभेटही घेतली.

गावसकर यापूर्वी अनेकदा म्हणाले आहेत की धोनीच्या खेळाचे चाहते आहेत. एकदा त्यांनी असेही म्हटले होते की त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी धोनीने २०११ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मारलेला विजयी षटकार पाहायला आवडेल.

धोनीचा अखेरचा हंगाम?

दरम्यान, आयपीएल २०२३ धोनीचा खेळाडू म्हणून अखेरचा हंगाम असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. त्यातच सध्या तो गुडघ्याच्या दुखापतीचाही सामना करत असल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. पण अद्याप धोनीने याबद्दल स्पष्टपण कोणतेही भाष्य केलेले नाही.

चेन्नईने चार वर्षांनी चेपॉकवर

खरंतर यंदा चेन्नईचा संघ तब्बल ४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चेपॉकवर सामने खेळला. यापूर्वी अखेरचे त्यांनी २०१९ साली चेपॉकवर सामने खेळले होते. त्यानंतर कोरोनाच्या कारणाने त्यांना गेल्या चार वर्षात या मैदानावर सामने खेळता आले नव्हते.

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईने चेपॉकवर खेळलेल्या ७ साखळी सामन्यांपैकी ४ सामने जिंकले, तर ३ सामने पराभूत झाले.

चेन्नई पुन्हा खेळणार चेपॉकवर?

खरंतर आयपीएल २०२३ मधील प्लेऑफच्या फेरीतील पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर हे दोन सामने चेपॉकवर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे जर चेन्नईने २० मे रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान पक्के केले, तर ते पुन्हा या हंगामात एक सामना चेपॉकवर खेळताना दिसू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT