Matheesha Pathirana Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: चेन्नईच्या खेळाडूने पहिल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर घेतला बळी

गुजरातने चेन्नईला या मोसमात दुसऱ्यांदा पराभूत केले आहे.

दैनिक गोमन्तक

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर पुन्हा एकदा गुढगे टेकले. गुजरातने चेन्नईला या मोसमात दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (15 मे) झालेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रशांत सोळंकी आणि मथिशा पाथिराना यांना पदार्पणाची संधी मिळाली. जगदीसन आणि सँटनर यांनी पुनरागमन केले. (Chennai player Matheesha Pathirana bags wicket on first ball in his debut match)

अ‍ॅडम मिल्नेच्या दुखापतीनंतर चेन्नईने श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाचा संघात समावेश केला होता. पाथिरानाने निराश केले नाही. त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलला एलबीडब्ल्यू बाद केले. यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये परतवले. पंड्या सात धावा करून शिवम दुबेकरवी झेलबाद झाला.

पाथिरानाने केला विक्रम
पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पाथिराना नववा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी पाच भारतीय आणि तीन परदेशी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. परदेशींमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन हारवुड, दक्षिण आफ्रिकेचा चार्ल लँगवेल्ट आणि वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ यांचा समावेश आहे. आयपीएल पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पाथिराना हा पहिला श्रीलंकेचा गोलंदाज ठरला आहे.

पाथिराना कोण आहे?
19 वर्षे 148 दिवस वयाच्या पाथिराना याचा जन्म श्रीलंकेतील कॅंडी येथे झाला. तो अद्याप एकाही प्रथम श्रेणी सामन्यात खेळलेला नाही. पाथिराना यंदाच्या आयसीसी अंडर-19 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. यंदाच्या आयपीएल लिलावात त्याने नाव नोंदवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT