Deepraj Gaonkar Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy : अखेरच्या सामन्यातही गोव्याच्या युवकांकडून निराशा

चंडीगडचा सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजय

किशोर पेटकर

CK Nayudu Trophy : गोव्याच्या युवक क्रिकेट संघाने कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील स्पर्धेतील अखेरच्या सामन्यातही निराशा केली. मंगळवारी त्यांना चंडीगडने चार विकेट राखून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी पराभूत केले.

चंडीगड येथील सेक्टर 16 स्टेडियमवर झालेल्या लढतीत यजमान संघाने 184 धावांचे लक्ष्य सहा विकेट राखून पार केले. मनीष काकोडे याने प्रतिस्पर्ध्यांची 79 धावांची सलामी भागीदारी फोडताना लागोपाठ दोन गडी बाद केले.

नंतर चंडीगडचा विजय दृष्टिपथास असताना राहुल मेहता याने त्यांना नियमित अंतराने तीन धक्के दिले, त्यामुळे यजमान संघाला विजय साकारण्यासाठी सहा विकेटचे मोल द्यावे लागले. चंडीगडला विजयाचे सहा गुण मिळाले. त्यांचे सात लढतीनंतर एकूण 26 गुण झाले. चंडीगडच्या दुसऱ्या डावात कर्णधार अर्जुन आझाद याची 89 धावांची खेळी निर्णायक ठरली.

दीपराजची एकहाती लढत

सामन्याच्या पहिल्या डावात 138 धावांची तडाखेबंद शतकी खेळी केलेला गोव्याचा कर्णधार दीपराज गावकर दुसऱ्या डावातही एकाकी लढला. त्यामुळे पहिल्या डावात 39 धावांची पिछाडीवर पडलेल्या गोव्याला दुसऱ्या डावात 222 धावांची मजल मारता आली. मात्र दीपराज सलग दुसरे शतक सात धावांनी हुकले.

अर्जुन आझाद याच्या गोलंदाजीवर 93 धावांवर यष्टिचीत बाद झाला. त्याने 113 चेंडूंतील आक्रमक खेळीत13 चौकार व एक षटकार मारला. गोव्याच्या कर्णधाराने आठव्या विकेटसाठी हेरंब परब (26) याच्यासमवेत 94 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला 7 बाद 126 वरून द्विशतकी धावसंख्या ओलांडल्याचे समाधान लाभले.

सात लढतीत पाच पराभव

गोव्याने स्पर्धेत निराशा केली. सात लढतीत त्यांनी पाच पराभव पत्करले. त्यांच्या खाती 10 गुण जमा झाले. बिहारविरुद्धच्या अनिर्णित लढतीत तीन, तर कमजोर अरुणाचल प्रदेशविरुद्ध डावाने मिळविलेल्या विजयामुळे सात गुण मिळाले. मात्र महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आंध्र व चंडीगड या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गोव्याची डाळ शिजली नाही व पराभूत व्हावे लागले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : सर्वबाद 225 व दुसरा डाव (1 बाद 28 वरून) : 72.4 षटकांत सर्वबाद 222 (राहुल मेहता 36, शिवम आमोणकर 1, मंथन खुटकर 10, कीथ पिंटो 13, कश्यप बखले 13, दीपराज गावकर 93, वासू तिवारी 18, मनीष काकोडे 5, हेरंब परब 26, जगदीश पाटील नाबाद 0, समीत आर्यन मिश्रा 0, करण शर्मा 2-33, रोहित धांडा 3-41, अर्जुन आझाद 3-3)

पराभूत वि. चंडीगड, पहिला डाव : सर्वबाद 264 व दुसरा डाव: 35.4 षटकांत 6 बाद 183(हरनूर सिंग 34, अर्जुन आझाद 89, ए. कुमार 24, मयांक सिद्धू नाबाद 20, हेरंब परब 4-0-21-0, समीत आर्यन मिश्रा 2-0-11-0, जगदीश पाटील 2-0-10-0, कीथ पिंटो 12-0-49-0, शिवम आमोणकर 1-0-11-0, मनीष काकोडे 8.4-0-47-2, राहुल मेहता 6-0-28-4).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT