Champions Trophy 2025 
क्रीडा

भारतातील World Cup 2023 ठरवणार कोणते संघ खेळणार पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी

Champions Trophy 2025: पाकिस्तानमध्ये 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठी आठ संघ पात्र ठरणार आहेत.

Pranali Kodre

Champions Trophy 2025 Qualification Through ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, आयसीसीच्या वेळापत्रकाप्रमाणे जवळपास 2031 पर्यंत दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्पर्धा होणार आहेत. 2025 साली पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. पण या स्पर्धेत कोणते संघ खेळणार याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वर्ल्डकप 2023 स्पर्धेत साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या सात क्रमांकावर राहणारे संघ आणि यजमान पाकिस्तान असे आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

आयसीसीच्या प्रवक्त्यांनी इएसपीएनला माहिती दिली आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेच्या पद्धतीसाठी आयसीसीने 2021 मध्येच मान्यता दिली होती. त्यावेळीच 2024-2031 दरम्यानच्या स्पर्धांबद्दल निर्णय घेण्यात आला होता, त्याच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुन्हा खेळवण्याचाही निर्णय झाला होता.

मात्र, काही दिवसांपूर्वी काही क्रिकेट बोर्डांनी त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीची पात्रता पद्धत माहित नसल्याचे म्हटले होते.

सध्याच्या वर्ल्डकप 2023 मधील गुणतालिकेनुसार 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर बांगलादेश आणि इंग्लंड आहेत. म्हणजेच जर वर्ल्डकप 2023 मध्ये पहिले 8 संघ पात्र ठरणार असतील, तर बांगलादेश आणि इंग्लंडही चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 साठी पात्र ठरणार नाहीत.

याबरोबरच वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या संघांनाही ही स्पर्धा खेळता येणार नाही. कारण हे तिन्ही संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेचीही पात्रता मिळवू शकले नव्हते.

दरम्यान, आयासीसीने 2021 मध्येच स्पष्ट केले होते की 2025 आणि 2029 साली खेळवण्यात येणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 संघात होणार आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच चार-चार संघांच्या गटात साखळी फेरीचे सामने खेळवण्यात येतील, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.

तथापि, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननेही यापूर्वीच स्पष्ट केले होते की वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानसह पहिल्या 8 स्थानी राहणारे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळतील.

यापूर्वी 2013 आणि 2017 साली खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत क्रमवारीतील अव्वल 8 संघ खेळले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT