MS Dhoni Video Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: धोनीचा विंटेज अंदाज! 1980 रोल्स रॉयस कारमधून रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका; Video व्हायरल

MS Dhoni: धोनीचा रांचीमध्ये विंटेज कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Pranali Kodre

MS Dhoni spotted driving vintage 1980 Rolls Royce: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशीच त्याची एक झलक रांचीमध्ये चाहत्यांनी टिपली असून यामध्ये तो एक विंटेज कार चालवताना दिसत आहे.

धोनीला कार आणि बाईक्सची असणारी आवड सर्वश्रुत आहे. तो अनेकदा त्याची बाईक किंवा कार झारखंडची राजधानी आणि धोनीची जन्मभूमी असलेल्या रांची शहरात चालवताना दिसतो. नुकताच त्याचा रांचीच्या रस्त्यांवर विंजेट 1980 रोल्स रॉयस कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी निळ्या रंगाची विंजेट 1980 रोल्स रॉयस कार चालवत आहे. त्याच्या शेजारी कोणीतरी बसल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, धोनीकडे अनेक विंटेज कार ते नव्या मॉडेलपर्यंतच्या कार आहेत. तसेच त्याच्याकडे अनेक बाईक्सही आहेत. रिपोर्ट्सनुसार धोनीकडे 15 हून अधिक कार आणि 70 च्या आसपास बाईक्स आहेत.

गॅरेजचा व्हिडिओ झालेला व्हायरल

काही दिवसांपूर्वीच धोनीच्या दोन मजली गॅरेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने रांचीमध्ये गेल्यानंतर धोनीची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्याच्या गॅरेजलाही भेट दिली. त्यावेळीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

या व्हिडिओमधून धोनीच्या अचंबित करणाऱ्या कार आणि बाईक्स कलेक्शनची झलक सर्वांना पाहायला मिळाली होती. धोनीला कार आणि बाईक्स तर आवडतातच, पण तो अनेकदा स्वत:च त्यांची निगा राखतानाही दिसतो.

भारताचा यशस्वी कर्णधार

कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT