Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND VS NZ: न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये येताच कोहलीने जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन!

कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) स्वतः न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एजाज पटेलचे अभिनंदन केले.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने (Team India) मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या विजयाचा ट्रेलर रिलीज केला आहे. पहिल्या डावात 325 धावा केल्यानंतर टीम इंडियाने किवींना अवघ्या 62 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. टीम इंडियाला 332 धावांची आघाडी मिळाली असून आता या कसोटीत विजय निश्चित दिसत आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या (New Zealand) फलंदाजीने निराशा केली. परंतु दुसरीकडे फिरकी गोलंदाज एजाज पटेलने (Ajaz Patel) इतिहास रचला. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात एजाज पटेलने भारताच्या सर्व 10 विकेट घेतल्या. कसोटी डावात 10 बळी घेणारा एजाज पटेल हा पहिला किवी गोलंदाज आहे. त्याचवेळी, जिम लेकर (Jim Laker) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यानंतर ही कामगिरी करणारा एजाज हा तिसरा गोलंदाज आहे.

एजाज पटेल यांच्या या कामगिरीला संपूर्ण जगाने सलाम केला. त्याचवेळी दुसऱ्या दिवसानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वतः न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एजाज पटेलचे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर विराट कोहली किवी ड्रेसिंग रुममध्ये आला आणि एजाज पटेलशी हस्तांदोलन करताना दिसला. फक्त विराट कोहलीच नाही. पहिल्या डावात शानदार 150 धावा करणाऱ्या मयंक अग्रवालनेही दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याचे अभिनंदन केले. मयंकने एजाजला मिठी मारली.

जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असलेल्या आर अश्विननेही डावात 10 विकेट घेतल्याबद्दल एजाज पटेलचे अभिनंदन केले. एका डावात 10 बळी घेणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते आणि एजाजने ते पूर्ण केले आहे, असे अश्विनने ट्विट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT