California shooting near FIFA world cup fan zone Dainik Gomantak
क्रीडा

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

California FIFA World Cup 2026 Fan Zone Deadly Shooting: सॅन पेड्रो स्क्वेअर भागात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक प्रशासनाने जवळील सर्व बार आणि पब तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले.

Manish Jadhav

California FIFA World Cup 2026 Fan Zone Deadly Shooting: कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या भीषण गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाला. सॅन पेड्रो स्क्वेअर भागात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक प्रशासनाने जवळील सर्व बार आणि पब तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून तपास मोहिमेसाठी अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले.

सॅन जोस पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळला, तर अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या दुसऱ्या जखमीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या जीवाला धोका असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून केली असून त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच, हल्लेखोराची ओळख किंवा या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कॅलिफोर्नियातील (California) सॅन पेड्रो स्क्वेअर हा सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील अधिकृत फिफा वर्ल्ड कप फॅन झोनपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. सुदैवाने, गोळीबाराची घटना घडली तेव्हा तिथे कोणताही फुटबॉल सामना सुरु नव्हता किंवा मोठ्या स्क्रीनवर दाखवला जात नव्हता, कारण त्या दिवसाचे सर्व सामने आधीच संपले होते. तरीही, सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून पोलीस अधिकारी पुरावे गोळा करत आहेत.

सॅन फ्रान्सिस्को बे एरियाने आतापर्यंत चालू फिफा वर्ल्ड कप 2026 च्या पाच सामन्यांचे यशस्वी आयोजन केले. या भागात पुढील महत्त्वाचा सामना गुरुवार, 2 जुलै रोजी 'राउंड ऑफ 32' अंतर्गत खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये बोस्निया आणि हर्झगोव्हिनाचा संघ यजमान अमेरिकेशी भिडणार आहे. या मोठ्या सामन्याच्या अवघ्या दोन दिवस आधी फॅन झोनजवळ झालेल्या या गोळीबारामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT