अखिल गोवा वेटरन्स टेबल टेनिस सांधीक स्पर्धेचे उदघाटन करताना आमदार विजय सरदेसाई. सोबत विक्रम वेर्लेकर, व्हेरो न्युनिस व मान्यवर.

 

Dainik Gomantak

क्रीडा

गोव्यात क्रिडा क्षेत्राचे खच्चीकरण सरदेसाई यांचा टोला

गोव्याच्या क्रिडामंत्र्यांना टेबल टेनिसपेक्षा गांधी मार्केट चांगले माहीत

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्याचे क्रिडामंत्री बाबू आजगावकर याना टेबल टेनिस (Table tennis) किंवा इतर क्रिडा प्रकारांपेक्षा गांधी मार्केट चांगले माहित आहे. मंत्र्यांच्या क्रिडा क्षेत्रातील अज्ञानामुळेच गोवा क्रिडा (Sports field) क्षेत्रात मागे पडत आहे. गोव्यात क्रिडा क्षेत्राचे खच्चीकरण होत आहे असा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यानी टोला लगावला.

दक्षिण गोवा टेबल टेनिस कौन्सिलने आयोजित केलेल्या अखिल गोवा वेटरन्स सांघीक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना विधान केले. गोव्यात टेबल टेनिस सारख्या खेळाला योग्य न्याय मिळत आहे का? या किंवा इतर क्रिडा प्रकारांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारचे (government) लक्ष आहे का? असे अनेक सवाल सरदेसाई यानी या प्रसंगी उपस्थित केले. 

गोवा अशा अज्ञानापासुन मुक्त करायचे आहे. गोव्यात जो गोंधळ सुरु आहे त्यापासुन मुक्ती हवी आहे. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. या सरकारातील मंत्री सरकारी नोकऱ्या विकत आहेत, त्यामुळे युवकांचे भविष्य अंधारमय होत आहे असेही सरदेसाई म्हणाले.

स्वागतपर भाषणात कौन्सिलचे अध्यक्ष विक्रम वेर्लेकर यानी सांगितले की कौन्सिल टेबल टेनिस खेळातील एक उत्कृष्टतेचे केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांत असुन राष्ट्रीय दर्जाची टेबल टेनिस अकादमी स्थापण्याचा आमचा विचार आहे.

या कार्यक्रमाला गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व्हेरो न्युनिस, पदाघिकारी सुभाष पंडित, कौन्सिलचे सचिव सुदीन वेरेकर, खजिनदार निलेश किर्तनी, सदस्य श्याम केणी उपस्थित होते.

या प्रसंगी टेबल टेनिस खेळातील अगदी लहान उभरत्या टेबल टेनिसपटुंचा गौैरव करण्यात आला. यात ध्रुव कामत, मार्क दा कॉस्ता, चंदन कार चंदन कारे, आरुश आर्सेकर, किनन डिसोझा, अर्श सहकारी,चिन्मय भरणे, ओझील कोर्दो, युग प्रभु यांचा समावेश आहे. या स्पर्धेत 13 संघात मिळुन 78 खेळाडुंनी भाग घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT