Brock Lesnar Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Brock Lesnar Retirement: WWE फॅन्ससाठी मोठा धक्का! रेसलमेनियातील पराभवानंतर ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा? भावूक व्हिडिओ व्हायरल

Brock Lesnar Retirement Video: WWE च्या इतिहासातील सर्वात प्रसिध्द रेसलर ब्रॉक लेसनरने रिंगला अलविदा म्हटल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Sameer Amunekar

WWE च्या इतिहासातील सर्वात प्रसिध्द रेसलर ब्रॉक लेसनरने रिंगला अलविदा म्हटल्याची चर्चा सुरू आहे. रेसलमेनिया ४२ च्या महामुकाबल्यात युवा खेळाडू ओबा फेमीने ब्रॉक लेसनरचा पराभव करत सर्वांना चकित केले. मात्र, या पराभवापेक्षा सामन्यानंतर रिंगमध्ये जे घडले, त्याने उपस्थित हजारो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले.

रिंगमध्ये सोडले ग्लोव्हज आणि शूज सामना संपल्यानंतर ब्रॉक लेसनर बराच वेळ रिंगमध्येच बसून होता. पराभवाचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. काही वेळाने त्याने संथ हालचाली करत आपले सिग्नेचर ग्लोव्हज (हातमोजे) काढले आणि रिंगच्या मध्यभागी ठेवले. इतकेच नाही तर त्याने आपले रेसलिंग शूजही काढून तिथेच ठेवले. रेसलिंगच्या दुनियेत जेव्हा एखादा खेळाडू आपले गियर रिंगमध्ये सोडून जातो, तेव्हा त्याचा अर्थ 'निवृत्ती' असा होतो. ब्रॉकने मॅटचे चुंबन घेतले आणि आपला जुना सहकारी पॉल हेमन याला मिठी मारली.

ओबा फेमीचा ऐतिहासिक विजय या सामन्यात ओबा फेमीने कमालीचे वर्चस्व गाजवले. ब्रॉकने आपला सर्वात घातक 'F5' हा मूव्ह फेमीवर लगावला, मात्र फेमीने त्यातून स्वतःला सावरले. त्यानंतर फेमीने एक जबरदस्त चोकस्लैम आणि 'फॉल फ्रॉम ग्रेस'चा वापर करत ब्रॉकला पिन केले. या विजयामुळे ओबा फेमी आता WWE चा नवीन चेहरा म्हणून समोर आला आहे, तर ब्रॉकचा हा शेवटचा सामना ठरल्याचे बोलले जात आहे.

दिग्गजांकडून निवृत्तीवर शिक्कामोर्तब? ब्रॉक लेसनरच्या या कृतीनंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले असतानाच, WWE दिग्गज कर्ट अँगल यांच्या एका पोस्टने यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसते. अँगलने 'एक्स'वर (ट्विटर) लिहिले की, "लव्ह यू ब्रदर! तुझ्यासारखा दुसरा कोणीही होणार नाही. तुझ्या निवृत्तीचा आनंद घे, ब्रॉक." या पोस्टमुळे आता अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता उरल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT