Shane Bond - Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

चारवेळा IPL जिंकून देणाऱ्या सदस्याचा मुंबई इंडियन्सला 'अलविदा'

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सबरोबर गेली 9 वर्षे असलेल्या खेळाडूचा करार संपला आहे.

Pranali Kodre

Bowling Coach Shane Bond ends his tenure with Mumbai Indians:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बॉन्डचा मुंबई इंडियन्सबरोबरचा 9 वर्षांचा करार संपला आहे. शेन बॉन्ड साल 2015 पासून मुंबई इंडियन्सशी जोडलेला होता.

शेन बॉन्डने मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून 2015 ते 2022 पर्यंत काम पाहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने अनेक चांगल्या गोलंदाजांना तयार केले आहे.

त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षी मुंबई इंडियन्सला आयपीएल विजेतेपद जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला. तसेच तो मुंबई इंडियन्स एमिरेट्स संघाचा मुख्य प्रशिक्षकही होता.

मुंबई इंडियन्सबरोबरच्या प्रवासाबाबत बॉन्ड म्हणाला, 'मी अंबानी कुटुंबाचे त्यांनी मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्या 9 हंगामात दिलेल्या संधीबद्दल आभार मानतो. मैदानात आणि मैदानाबाहेर माझ्यासाठी खूप चांगल्या आठवणी तयार झाल्या.'

'मला खूप दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची आणि चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. मला सर्वांची आठवण येईल आणि मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मी मुंबई इंडियन्स पलटनला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद देतो.'

शेन बाँडने त्याच्या मुंबई इंडियनसबरोबरच्या त्याच्या कालावधीत अनेक युवा खेळाडूंना शोधण्यापासून त्यांना खेळण्यासाठी तयार करण्यापर्यंत मोलाचा वाटा उचलला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचाही चांगला अनुभव होता.

त्याने 2010 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल देखील खेळले आहे. त्याने 8 आयपीएल सामने खेळले असून 9 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 18 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 87 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 82 वनडे सामने खेळले असून 147 विकेट्स घेतल्या आहेत. 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT