Chennai Super Kings Dainik Gomantak
क्रीडा

Chennai Super Kings: चेन्नईच्या फॉलोअर्ससमोर मुंबईचे चाहते फिके, ट्वीटरवर 10 मिलियनचा टप्पा पार!

Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये विक्रमी 5 विजेतेपदे पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने गुरुवारी आश्चर्यकारक कामगिरी केली.

Manish Jadhav

Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये विक्रमी 5 विजेतेपदे पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने गुरुवारी आश्चर्यकारक कामगिरी केली.

सध्या आयपीएलचा कोणताही सीझन सुरु नाही किंवा संघाचे कोणतेही सराव सत्र होत नाही, परंतु आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने जे करुन दाखवले आहे ते यापूर्वी कोणीही करु शकले नाही.

धोनीची क्रेझ

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करतो. चाहत्यांमध्ये धोनीची क्रेझ अशी आहे की, त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले जाते.

जरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अजूनही आयपीएलमध्ये (IPL) खेळतो. 42 वर्षीय धोनीची फिटनेसही युवा खेळाडूंना लाजवेल अशी आहे. आता धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला पसंती देणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे.

आश्चर्यकारक कामगिरी केली

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज टीम एक्स (ट्विटर) वर 10 दशलक्ष फॉलोअर्स असलेला पहिला संघ बनला आहे. त्याने गुरुवारी 10 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला.

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम मिलाफ असलेला हा संघ गेल्या मोसमातही चॅम्पियन ठरला होता. त्याने फायनलमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाचा पराभव करुन पाचव्यांदा ट्रॉफी उंचावली.

धोनीने अनेक वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले

धोनीने अनेक वर्षे भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. धोनीला केवळ त्याचे सहकारी खेळाडूच नाहीत, तर परदेशातील दिग्गज खेळाडूही पसंत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT