Goa Cricket Umpire | Saiyed Khalid: Dainik Gomantak
क्रीडा

Cricket World Cup 2023: गोव्याचे पंच सय्यद खलिद यांना मोठी संधी; वर्ल्डकपमध्ये 2 सामन्यांत करणार पंचगिरी

रणजी करंडक, दुलिप करंडक, देवधर करंडक स्पर्धेतही पार पाडली कामगिरी

किशोर पेटकर

Goa Cricket Umpire Saiyed Khalid: गोव्याचे अनुभवी क्रिकेट पंच सय्यद खलिद यांना मोठी संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशात होणाऱ्या आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील दोन सराव सामन्यांसाठी त्यांची पंचगिरीसाठी निवड केली.

गुवाहाटी येथे 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बांगलादेश व श्रीलंका आणि 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत व इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात 47 वर्षीय खलिद ऑनफिल्ड पंच असतील. यापूर्वी खलिद यांनी रणजी करंडक, दुलिप करंडक, देवधर करंडक या देशांतर्गत प्रमुख स्पर्धांसह आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही पंचगिरी केली आहे.

शिवाय महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व टी-20 क्रिकेट लढतीतही त्यांनी पंच म्हणून जबाबदारी पेलली आहे. 2006-2007 मध्ये बीसीसीआय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2008 पासून खलिद प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंचगिरी करत आहेत.

ते गोव्याचे माजी रणजीपटू आहेत. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 1996-97 ते 2002-03 या कालावधीत 27 रणजी सामन्यांत 62 विकेट, तर 23 लिस्ट ए (एकदिवसीय) सामन्यांत 23 विकेट मिळविल्या आहेत.

‘‘विश्वकरंडक क्रिकेट सराव सामन्यांत पंचगिरीसाठी निवड झाल्याने सर्वप्रथम मी आश्चर्यचकीतच झालो. मोठ्या पातळीवरील सामन्यांत पंचगिरी करताना आता जबाबदारीही अधिक प्रमाणात वाढली आहे.

संधी दिल्याबद्दल मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनचाही आभारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया सय्यद खलिद यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT