Shivam Dubey  Dainik Gomantak
क्रीडा

मुंबईच्या रणजी संघाला मोठा झटका, शिवम दुबे संघाबाहेर

शिवम दुबे खांद्याच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीच्या फेरीच्या सामन्यांसाठी अनुपलब्ध आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने सांगितले.

दैनिक गोमन्तक

अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला रणजी नॉकआउट साठी मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू खांद्याच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीच्या फेरीच्या सामन्यांसाठी अनुपलब्ध आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने सांगितले. मुंबई संघासाठी हा मोठा धक्का आहे. त्याचबरोबर सलामीवीर पृथ्वी शॉला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या अजिंक्य रहाणेचाही संघात समावेश नाही. सलील अंकोला निवड समितीने युवा मुशीर खानचा 21 जणांच्या संघात समावेश केला आहे, ज्याने त्याच्या वयोगटातील क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय त्याचा मोठा भाऊ सरफराज खानचाही मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे, जो दीर्घकाळ संघासाठी मोठी खेळी करत आहे.

6 ते 10 जून दरम्यान बंगळुरू येथे होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईची लढत उत्तराखंडशी होणार आहे. इतर उपांत्यपूर्व फेरीत बंगाल विरुद्ध झारखंड, कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश आणि पंजाबविरुद्ध मध्य प्रदेश आहेत. मुंबईने उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. उत्तराखंड बघितले तर मुंबईचा वरचष्मा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT