Bhuvneshwar Kumar X/BCCIDomestic
क्रीडा

Bhuvneshwar Kumar Video: टीम इंडियात जागा न मिळालेला भूवी गरजला! तब्बल 8 खेळाडूंची केली शिकार; शमीचा भाऊही चमकला

Ranji Trophy: सहा वर्षांनी भूवनेश्वर कुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत गोलंदाजी कमाल केली.

Pranali Kodre

Ranji Trophy 2023-24, Uttar Pradesh vs Bengal, Bhuvneshwar Kumar 8 Wickets Haul, Mohammad Kaif all-round performance:

भारतात सध्या रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत कानपूरला उत्तर प्रदेश विरुद्ध बंगाल संघात सामना सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ चमकला आहे.

भुवनेश्वर उत्तरप्रदेशकडून, तर मोहम्मद कैफ बंगालकडून खेळत आहेत. शुक्रवारी (12 जानेवारी) चालू झालेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी केली. मात्र उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात 20.5 षटकात 60 धावांवरच सर्वबाद झाला.

या डावात मोहम्मद कैफने बंगालकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने 5.5 षटके गोलंदाजी करताना 14 धावा खर्च करताना या 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय सुरज सिंधू जयस्वाल आणि इशान पोरेल यांनी अनुक्रमे 3 आणि 2 विकेट्स घेतल्या.

भूवीचा भेदक मारा

त्यानंतर बंगाल संघ फलंदाजीला उतरला.बंगालकडून सौरव पॉल आणि श्रेयांश घोष यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, नंतर भुवनेश्वर कुमारने आपली कमाल दाखवली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर बंगालची फलंदाजी कोलमडली.

भुवनेश्वरने 11 व्या षटकात तीन सलामीवीर सौरव पॉल (13) आणि सुदीप कुमार घरामी (0) यांना बाद केले. त्यानंतर त्याच्या स्पेलमध्ये त्याने डावाच्या 16 व्या षटकात अनुस्तुप मुजूमदारला 12 धावांवर माघारी धाडले, तर कर्णधार मनोज तिवारीला 3 धावांवरच बाद केले.

अभिषेक पोरेललही भुवेनेश्वरने फार वेळ टिकू न देता 12 धावांवर बाद केले. त्यामुळे भुवनेश्वरने 5 विकेट्ससह बंगालची वरची फळी पूर्ण उद्धस्त केली. तरी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर श्रेयांश घोषने एक बाजू सांभाळलेली होती. पहिल्या दिवसाखेर बंगालने 28 षटकात 5 बाद 95 धावा केल्या होत्या.

मोहम्मद कैफची फलंदाजीतही चमक

दुसऱ्या दिवशी 30 व्या षटकात यश दयालने करण लालला 12 धावांवर बाद करत उत्तर प्रदेशकडून चांगली सुरुवात केली. त्यानंतर लगेचच श्रेयांश घोषला (41) 31 व्या षटकात आणि प्रदिप्ता प्रामाणिकला (1) 33 व्या षटकात भुवनेश्वरने बाद करत बंगालला मोठे धक्के दिले होते.

मात्र, बंगालच्या गोलंदाजांनी फलंदाजीतही चमक दाखवली. मोहम्मद कैफ आणि सुरज सिंधू जयस्वाल यांच्यात 9 व्या विकेटसाठी तब्बल 52 धावांची भागीदारी झाली. अखेर ही भागीदारीही भुवनेश्वर कुमारनेच तोडली. त्याने सुरजला 20 धावांवर बाद केले.

नंतरही कैफला इशान पोरेलने साथ देताला अखेरच्या विकेटसाठी 26 धावा जोडल्या. पण कैफला 10 धावांवर यश दयालने बाद करत 58.2 षटकात 188 धावांवर बंगालचा पहिला डाव संपवला. त्यामुळे बंगालला 128 धावांची आघाडी मिळाली. बंगालकडून मोहम्मद कैफ 45 धावांवर नाबाद राहिला.

भुवीचे 6 वर्षांनी कमबॅक

उत्तर प्रदेशकडून या डावात भुवनेश्वरने 22 षटके गोलंदाजी करताना 41 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर यश दयालने 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 6 वर्षांनी पुनरागमन केले.

तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अखेरीस 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. दरम्यान, 2018 नंतर तो भारताकडून मात्र अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT