Bhakti Kulkarni Goa Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याची भक्ती भारतीय बुद्धिबळ ऑलिंपियाड संघात

28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नईत होणार स्पर्धा

Kishor Petkar

पणजी : चेन्नई येथे होणाऱ्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेसाठी भारतीय संघात गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिची निवड झाली आहे. स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने 20 सदस्यीय संघाची सोमवारी घोषणा केली. पुरुष आणि महिला गटात भारताचे प्रत्येकी दोन संघ खेळतील. ऑनलाईन पद्धतीने 2020 मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले होते, विदित गुजराथी याच्या नेतृत्वाखालील संघात भक्तीचा समावेश होता.

महिलांच्या मुख्य संघात भक्तीसह कोनेरू हंपी, जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेली हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर. वैशाली यांचा समावेश आहे. ऑनलाईन स्पर्धेत खेळलेली भक्ती प्रत्यक्ष ऑलिंपियाडमध्ये पदार्पण करत आहे. पाच वेळचा जागतिक विजेता विश्वनाथन आनंद ऑलिंपियाड स्पर्धेत खेळणार नाही, मात्र तो भारतीय संघाचा मेंटॉर असेल.

भारताने 2014 साली बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. नंतर 2020 मध्ये ऑनलाईन ऑलिंपियाडमध्ये रशियासह संयुक्त सुवर्णपदक, तर 2021 साली ऑनलाईन ऑलिंपियाडमध्ये महिला संघाने ब्राँझपदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT