Bhagwani Devi Twitter/ @IndiaSports
क्रीडा

94 वर्षीय भगवान देवींची कामगिरी, जागतिक मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत जिंकले 'सुवर्ण'

भारताच्या 94 वर्षीय देवी डागर यांनी इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

Bhagwani Devi Gold Medal India World Masters Athletics Championships 2022: भारताच्या 94 वर्षीय देवी डागर यांनी इतिहास रचला आहे. जागतिक मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम केला आहे. भगवानी देवी सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. हरियाणाच्या भगवानी देवी यांनी 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

दरम्यान, फिनलंडमधील (Finland) टेम्पेरेमध्ये पार पडलेल्या 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत भगवान देवी (Bhagwani Devi) यांनी अवघ्या 24.74 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. यासह त्यांनी शॉटपुटमध्येही कांस्यपदक पटकावले आहे. भगवानी यांच्या या शानदार विजयाबद्दल क्रीडा मंत्रालयाने त्यांचे अभिनंदन केले आहे. मंत्रालयाने त्यांच्या फोटोसह अभिनंदनाचा संदेश दिला आहे.

मंत्रालयाने ट्विट करत म्हटले की, "भारताच्या (India) 94 वर्षीय भगवान देवींनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वय हा अडथळा नाही! त्यांनी टेम्पेरे येथील #वर्ल्डमास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर स्प्रिंट स्पर्धेत 24.74 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. तसेच शॉटपुटमध्येही कांस्यपदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT