Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

'आम्ही अशी गाडी नाही की ज्यात पेट्रोल भरता येईल': Ben Stokes

International Cricket: इंग्लंडचा स्टार क्रिकेटर बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Ben Stokes: इंग्लंडचा स्टार क्रिकेटर बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी स्टोक्सने घोषणा केली की, 'या मालिकेतील पहिला सामना आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना असेल.'

दरम्यान, व्यस्त वेळापत्रकामुळे स्टोक्सने हा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा (South Africa) हा सामना त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला नाही. स्टोक्सला शानदार कामगिरी करता आली नाही आणि त्याच्या संघालाही पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेण्याबाबत स्टोक्स म्हणाला, 'हे कधीच सोपे नव्हते. आता मी कसोटी संघाचा कर्णधार झालो आहे. मला माझ्या शरीराचीही काळजी घ्यावी लागणार आहे.'

स्टोक्स (Ben Stokes) पुढे म्हणाला, मला इंग्लंडसाठी (England) 140-150 कसोटी सामने खेळायचे आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये (Cricket) तुम्हाला फक्त तीन-चार षटके टाकावी लागतात. मला आशा आहे की, जेव्हा मी 35-36 वर्षांचा होईन तेव्हा मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT