BCCI reprimanded PCB Pakistan Should stop crushing India Dainik Gomantak
क्रीडा

या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळच नाही, BCCI ने PCB ला फटकारलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) नेहमी अपयश लपवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दोषी धरण्याची जुनी सवय आहे

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) नेहमी अपयश लपवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दोषी धरण्याची जुनी सवय आहे. नुकतेच न्यूझीलंड (New Zeeland) संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान (Pakistan) दौरा रद्द केल्यानंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर इंग्लंडने (ECB) त्यांचा आगामी पाकिस्तान दौरा रद्द केला होता. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला. यामुळे निराश होऊन पाकिस्तान सातत्याने यासाठी भारतावर निराधार आरोप करत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत पीसीबीला फटकारले आहे.(BCCI reprimanded PCB Pakistan Should stop crushing India)

काय आहे प्रकरण

न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला, तर इंग्लंड संघाने खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक स्थिरता राखण्यासाठी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तानला आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या मोठा फटका बसला. त्यानंतर पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी दोन्ही देशांना बरेच काही सुनावले होते. या सर्व घटनांच्या दरम्यान, पाकिस्तानचे काही मंत्री आणि माजी खेळाडूंनी दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात सांगितला आहे. यासाठी ते बीसीसीआयला दोषी ठरवत आहेत.

BCCI ने फटकारलं

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला भारताला कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या मुद्द्यामध्ये सामील करण्याची जुनी सवय आहे, ती देखील कोणत्याही पुराव्याशिवाय. असे म्हणत त्यांनी पीसीबीला उत्तर दिले आहे. तसेच "आम्ही रमीज राजा, पाकिस्तानला शुभेच्छा देतो. त्याचबोरोबर एक गोष्ट स्पष्ट आहे की न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द करण्यामागे बीसीसीआयचा हात नाही." असे सुनावत पसीबीला फटकारले आहे.

"या सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाही. मला माहित नाही की पाकिस्तानचे काही माजी खेळाडू आयपीएलला दोष का देत आहेत? मी कुठेतरी वाचले होते की रमीज म्हणाला की ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पैशांसाठी हे केले.रमीज ने असा आरोप देखील केला आहे की आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आपली आक्रमक वृत्ती सोडून भारताविरुद्धचा सामना सहज पद्धतीने खेळतात. आता यात आयपीएल कोठून आले? आता कोणत्या प्रकारचा आरोप आहे? आम्हाला माहित आहे की त्यांना ते आवडत नाही पण प्रत्येक मुद्द्यामध्ये भारताला सामील करणे योग्य नाही."असे म्हणत त्यांनी पीसीबीला सडेतोड उत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT