IND vs PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: भारत-पाकिस्तान कसोटी सामन्याबाबत BCCI स्पष्टच..., PCB चे उडाले होश

IND vs PAK Test Match: अलीकडेच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात कसोटी सामना होत असल्याच्या बातम्या आल्या.

दैनिक गोमन्तक

IND vs PAK Test Match At MCG: अलीकडेच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात कसोटी सामना होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारनेही यजमानपदाबद्दल ऑस्ट्रेलियाकडे अनौपचारिक चौकशी केली होती. आता बीसीसीआयच्या एका सूत्राने या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआय या सामन्यासाठी विचार करत आहे की नाही हे त्यांनी सांगितले आहे.

MCC ने IND vs PAK मॅच ऑफर केली होती

ऑक्टोबरमध्ये भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक सामन्याच्या यशानंतर मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. हा सामना पाहण्यासाठी 90,293 चाहते स्टेडियममध्ये पोहोचले होते. MCC चे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी खुलासा केला होता की, क्लब तसेच व्हिक्टोरियन सरकारने तटस्थ स्थळ कसोटी आयोजित करण्याबाबत CA कडे चौकशी केली होती.

बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती दिली

बोर्ड भारत-पाकिस्तान (Pakistan) कसोटी सामन्याबाबत विचार करत नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्राने स्पष्ट केले. दोन्ही संघांमध्ये हा सामना पाहायला मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, "भविष्यात किंवा कोणत्याही देशात भारत आणि पाकिस्तान कसोटी मालिकेसाठी अशी कोणतीही योजना नाही, जर कोणाची अशी इच्छा असेल तर ती स्वतःकडे ठेवा." याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, चाहत्यांना दोन्ही संघांमधील एकही कसोटी सामना पाहायला मिळणार नाही.

आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा तणावामुळे (IND vs PAK) अनेक दिवसांपासून कोणतीही क्रिकेट मालिका झालेली नाही. 2007 साली उभय संघांमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. त्याचवेळी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची मालिका (IND vs PAK) 2012 मध्ये खेळली गेली होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला भेट दिली होती. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) स्पर्धेत आमनेसामने येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT